लग्न, घटस्फोट आणि आयुष्यात जुन्या प्रेमाची एन्ट्री! 'प्रेमाची गोष्ट २' चा भन्नाट ट्रेलर रिलीज, हसून हसून लोटपोट व्हाल

Last Updated:

Premachi Goshta 2 Trailer : 'प्रेमाची गोष्ट २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे गाणे आणि टीझर आधीच धुमाकूळ घालत असताना, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

News18
News18
मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'प्रेमाची गोष्ट २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे गाणे आणि टीझर आधीच धुमाकूळ घालत असताना, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, जिथे ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी त्यांच्या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

लग्नानंतरचा गोंधळ आणि नशिबाची दुसरी संधी

'प्रेमाची गोष्ट २' च्या ट्रेलरमध्ये ललित प्रभाकरच्या भूमिकेतील व्यक्तीच्या आयुष्यात आलेली उलथापालथ अगदी स्पष्ट दिसते. लग्न, घटस्फोट आणि अचानक समोर आलेले जुने प्रेम... या सगळ्यामुळे त्याचे आयुष्य एका मोठ्या गोंधळात सापडते. आपल्या चुका आणि नशिबाचा दोष तो देवावर टाकतो.
पण इथेच कथा एक मोठे वळण घेते! देव त्याला त्याचे नशीब बदलण्याची दुसरी संधी देतो का? आणि जर मिळाली, तर ललित हे जुने प्रेम आणि नव्या नात्याचा गोंधळ कसा सोडवतो? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना थेट चित्रपटगृहात मिळणार आहेत. व्हीएफएक्स, आजच्या काळातील प्रेमाचे बदलते रूप आणि नात्यांमधील संवाद या सगळ्याची सुंदर मांडणी या ट्रेलरमध्ये आहे.
advertisement
advertisement
दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, "ही एक एकदम ताजी आणि आजच्या पिढीला जोडणारी प्रेमकथा आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर केवळ दिसायला सुंदर करण्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा एक नवा मार्ग म्हणून केला आहे. हा चित्रपट सध्याच्या तरुण पिढीला आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारा आहे. म्हणजे हा संपूर्ण कुटुंबासाठी आहे."
advertisement
निर्माते संजय छाब्रिया यांनीही या चित्रपटाबद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "सतीश आणि मी नेहमीच प्रेक्षकांसाठी हटके आणि मनाला भिडणाऱ्या कथा घेऊन आलो आहोत. 'प्रेमाची गोष्ट २' ही त्याच परंपरेतील कथा आहे, जी आजच्या पिढीच्या भावनांना आणि विचारांना अचूकपणे स्पर्श करते. सतीश राजवाडे यांनी ही कथा ज्या संवेदनशीलतेने उभी केली आहे, ती प्रेक्षकांना नक्की आवडेल."
advertisement
'प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास' प्रेक्षकांना २१ ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवता येणार आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्न, घटस्फोट आणि आयुष्यात जुन्या प्रेमाची एन्ट्री! 'प्रेमाची गोष्ट २' चा भन्नाट ट्रेलर रिलीज, हसून हसून लोटपोट व्हाल
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement