advertisement

पंकजा मुंडेंना धक्का, कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे यांनी साथ सोडली, मनगटावर घड्याळ बांधणार

Last Updated:

Pankaja Munde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मंत्री पंकजा मुंडे यांना बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार आणि पंकजा मुंडे
अजित पवार आणि पंकजा मुंडे
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांना धक्का देत गेल्या ३५ वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले निकटवर्तीय राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहे. मात्र पक्षातून डावलले जात असल्याने राजाभाऊ मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने पंकजा मुंडे यांना धक्का मानला जातोय.

विधानसभेची निवडणूक लढविल्याने पंकजा मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्यात मतभेद

advertisement
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून लवकरच तारीख देखील जाहीर केली जाणार आहे. दरम्यान बाबरी मुंडे यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. याच कारणावरून पंकजा मुंडे व बाबरी मुंडे यांच्यात मतभेद झाले होते.
advertisement
त्यानंतरपासून बाबरी मुंडे हे कोणत्याही पक्षाशी संलग्न नव्हते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले असून माजलगाव मतदारसंघातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून लवकर द्यायची तारीख जाहीर केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडेंना धक्का, कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे यांनी साथ सोडली, मनगटावर घड्याळ बांधणार
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement