देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? महाराष्ट्राचा मूड काय? मुख्यमंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या वर्षात पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, डिजिटल शेती, जलयुक्त शिवार योजनेला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण मराठा आरक्षणावर तणाव कायम.
वर्षभरापूर्वी, महाराष्ट्रात प्रचंड आणि अभूतपूर्व बहुमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. या मोठ्या जनादेशासोबतच लोकांच्या मोठ्या अपेक्षांचे ओझेही त्यांच्या खांद्यावर होते. मागच्या कार्यकाळात सरकार स्थिर ठेवण्याची कसोटी होती, पण यावेळी भक्कम बहुमतामुळे त्यांनी सरकार स्थापन करण्यात यश आलं. या पहिल्या वर्षात सरकारने काय मिळवले आणि कोणत्या आघाड्यांवर त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पुन्हा एकदा गती दिली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबईतील किनारी रस्ता आणि मेट्रोचे जाळे यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर वेगाने काम सुरू झाले आहे. मराठा आरक्षणासारखे जटील आणि संवेदनशील प्रश्न हाताळताना सरकारला मोठी कसरत करावी लागली. आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असले तरी, विविध समाजघटकांचे पूर्ण समाधान करण्यात त्यांना अपयश आले, ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला.
राज्यात गुंतवणूक वाढतीय पण प्रादेशीक समतोल त्यांना राखता आला का? वर्षभरातली उपलब्धी काय आणि कमकुवत बाजू कोणत्या? गेल्या वर्षभरातलं मुख्यमंत्री फडवणीसांचं रिपोर्ट कार्ड समोर आलं आहे. पीआर आणि सोलुशन कंपनीनं केलेलं हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेबर 2025 या काळात करण्यात आलं. 36 जिल्ह्यातील 5362 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं, त्यानुसार देवेंद्र फडणवीस केंद्रात जावे की महाराष्ट्रातच राहावेत, जनतेच्या मनात नेमकं काय? जनतेचा मूड काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
गेल्या एक वर्षातील फडणवीस सरकारच्या एकूण कामगिरीबाबत आपलं मत काय?
पूर्णत: समाधानी
- शहरी - 39%
- ग्रामीण - 39%
- एकूण - 39%
काही अंशी समाधानी
- शहरी - 42%
- ग्रामीण - 38%
- एकूण - 40%
सर्वसाधारण
- शहरी - 12%
- ग्रामीण - 15%
- एकूण - 13%
सुधारणा आवश्यक
- शहरी - 6%
- ग्रामीण - 9%
- एकूण - 7%
advertisement
आरोग्य, शिक्षण, परिवहन आणि सुरक्षा यांसारख्या सार्वजनिक विभागांच्या हाताळणीबाबत आपलं मत काय आहे?
- पूर्णत: समाधानी 33%
- काही अंशी समाधानी 39%
- सुधारणा आवश्यक 10%
- सर्वसाधारण 18%
प्रशासन चालवताना समोर अनेक अडचणी असूनही फडणवीस सरकारनं जबाबदारीपूर्वक कार्य पार पाडली का?
अत्यंत प्रभावीपणे
- ग्रामीण - 34%
- शहरी - 34%
advertisement
सर्वसाधारण
- ग्रामीण - 30%
- शहरी - 26%
आणखी वेग आवश्यक
- ग्रामीण - 32%
- शहरी - 36%
विशेष प्रभाव नाही
- ग्रामीण - 4%
- शहरी - 5%
सरकार स्थिर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी राजकीय आघाड्या कितपत प्रभावीपणे सांभाळल्या?
- अत्यंत प्रभावीपणे- 38%
- काही अंशी प्रभावीपणे- 33%
- तटस्थ - 2%
- विशेष प्रभावी नाही - 27%
गेल्या एक वर्षात फडणवीस सरकारचं एकूण राजकीय स्थैर्य मागील सरकारच्या तुलनेत कसं आहे?
advertisement
- आधीच्या पेक्षा खूप स्थिर - 41%
- साधारण स्थिर- 41%
- तटस्थ - 14%
- आधीपेक्षा कमी स्थिर- 5%
राजकीय स्थैर्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रगतीस मदत होईल असं वाटतं का?
- हो काही प्रमाणात -59%
- हो मोठ्या प्रमाणात- 30 %
- तटस्थ - 8%
- नाही -3%
देवेंद्र फडणवीसांनी कुठे काम केलेलं आवडेल? केंद्रांत की राज्यात?
शहरी
- केंद्रात - 48%
- राज्यात - 52%
advertisement
ग्रामीण
- केंद्रात - 42%
- राज्यात - 58%
एकूण
केंद्रात - 45%
राज्यात - 55%
जीएसटी अनुपालन आणि जीएसटीचं फायलिंग पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे का?
- पूर्णत: सहमत 38%
- काही अंशी सहमत 46%
- पूर्वीसारखे 10%
- सुधारणा आवश्यक 6%
राज्यात उद्योग आणि गुंतवणूकवाढीसाठी फडणवीसांच्या प्रयत्नांविषयी आपलं काय मत आहे?
- अत्यंत समाधानी - 31%
- काही अंशी समाधानी - 43%
- पूर्वीसारखेच - 15%
- तटस्थ - 5%
- सुधारणा आवश्यक - 6%
advertisement
रस्ते, पूल आणि परिवहन जोडणी फडणवीस सरकारच्या काळात वाढलं असं वाटतं का?
- मोठ्या प्रमाणात - 42%
- काही प्रमाणात - 41%
- नाही - 5%
- सांगता येत नाही - 13%
कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड टनेल्स, नवीन पूल बांधणी यांसारखे प्रकल्प वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत करतील का?
- खूप मोठ्या प्रमाणात - 59%
- काही प्रमाणात - 26%
- तटस्थ - 12%
- फारशी नाही - 3%
फडणवीस सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येत्या वर्षात आर्थिक विकासाला गती मिळेल असा किती विश्वास आहे?
- अत्यंत विश्वास - 37%
- काही प्रमाणात विश्वास - 41%
- तटस्थ - 16%
- विश्वास नाही - 6%
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पायाभूत सुविधा विकासगती फडणवीस सरकारमुळे पुढे आहे असं वाटतं का?
- हो नक्कीच - 40%
- हो काही प्रमाणात - 43%
- साधारण समान - 14%
- नाही - 4%
नैसर्गिक आपत्ती, जसं अतिवृष्टीमुळे होणारं पिकांचं नुकसान, घरांचं नुकसान यासाठी फडणवीस सरकारनं केलेल्या मदतीबद्दल आपलं काय मत आहे?
- अतिशय चांगली मदत - 41%
- काही प्रमाणात मदत - 39%
- पूर्वी एवढीच मत- 12%
- अधिक मदतीची गरज-7%
ई-पीक पाहणी, ऑनलाईन अनुदान, पीक अपडेट्स यांसारख्या डिजिटल सेवांमुळे शेतीसंबंधित प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत का?
- खूप सोपी झाली आहे - 48%
- काहीप्रमाणात सोपी - 43%
- काहीच बदल नाही -9%
जलयुक्त शिवार आणि इतर पाणी संवर्धन योजनांनी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आहे असं वाटतं का?
- हो निश्चितपणे - 42%
- हो पण थोड्याच प्रमाणात - 39%
- तटस्थ -16%
- परिस्थिती सुधारली नाही- 3%
तुम्हाला किंवा कुटुंबातील व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे का?
हो पूर्ण लाभ मिळाला
- शहरी - 45%
- ग्रामीण - 49%
- एकत्र - 47%
लाभ नाही, पण योजना माहीत
- शहरी -48%
- ग्रामीण - 47%
- एकत्र - 48%
अजिबात नाही
- शहरी -7%
- ग्रामीण - 4%
- एकत्र -6%
प्रशिक्षण, कौशल्यविकास व उद्योजकता योजनांच्या माध्यमातून फडणवीस सरकार महिला सक्षमीकरणासाठी अधिक संधी निर्माण करत आहे का?
- निश्चित प्रमाणात - 35%
- हो पण थोड्या प्रमाणात- 43%
- तटस्थ - 15%
- सुधारणा आवश्यक - 6%
महिला बचत गट, लघुउद्योग, रोजगार संधी यासाठी फडणवीस सरकारच्या कामाबद्दल आपलं मत काय आहे?
अत्यंत समाधानी
- शहरी - 36%
- ग्रामीण- 39%
- एकत्र - 37%
काही प्रमाणात समाधानी
- शहरी - 43%
- ग्रामीण- 43%
- एकत्रित - 43%
सुधारणा आश्यक
- शहरी - 9%
- ग्रामीण- 5%
- एकत्रित - 7%
तटस्थ
- शहरी - 12%
- ग्रामीण-14%
- एकत्र -7%
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? महाराष्ट्राचा मूड काय? मुख्यमंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड


