Marathi Serial Off Air : 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका Off Air! या दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड

Last Updated:
Laxmichya Pavlani Last Episode : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मालिकेचा शेवटचा एपिसोड देखील शूट करण्यात आला. मालिकेचा शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणारा याची माहिती समोर आली आहे.
1/7
स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या लोकप्रिय मालिकेतून प्रमुख नायिका म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिने एक्झिट घेतली. ईशाने तिच्या प्रकृतीच्या कारणामुळे मालिका सोडल्याचं सांगितलं. दरम्यान ईशा केसकरने मालिकेला टाटा बाय बाय केल्यानंतर मालिकेनं देखील गाशा गुंडाळला आहे. 

advertisement
2/7
लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत मालिका टॉप 5 यादीत स्थान टिकवून होती. प्रेक्षकांचं मालिकेला प्रतंच प्रेम मिळालं. पण ही मालिका आता Off Air होत आहे.

3/7
विशेष म्हणजे अभिनेत्री ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर काही दिवसांतच मालिकेनं गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांमध्ये मिश्र भावना व्यक्त होत आहेत.

4/7
मालिकेची मुख्य नायिका ईशा केसकर अचानक आजारपणामुळे बाहेर पडली होती. तिच्या जागी अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. नक्षत्रा मुख्य भूमिका साकारत असतानाच काही दिवसांतच मालिका संपणार असल्याची बातमी समोर आली. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

5/7
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा शेवटचा भागही शूट झाला आहे. कलाकारांनी सेटवर शेटवचा दिवस देखील सेलिब्रेट केला.  One Last Time असं कॅप्शन देत कलाकारांनी सेटवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. दोन वर्षे एकत्र काम केलेल्या टीमच्या डोळ्यांतून निरोपाची भावना दिसून आली.

6/7
20 नोव्हेंबर 2023 पासून लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू झाली होती. तब्बल दोन वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  अद्वैत–कला या जोडीमुळे विशेष लोकप्रिय ठरली. आता ही मालिका संपणार असल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

7/7
लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका रात्री 9.30 वाजता टेलिकास्ट होत होती. मालिकेचा शेवटचा एपिसोड 12 डिसेंबरला टेलिकास्ट होणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरपासून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जागी वचन दिले तू मला ही नवी मालिका सुरू होणार आहे. काही दिवसांआधीच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement