Pune Crime : नर्तिकेवर पैसे उधळण्यासाठी पुण्यातील व्यक्तीचं कांड; शेजाऱ्याचं घर फोडून सहा लाखाची चोरी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अभिजित पठारे हे विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना, राहुलने संधी साधून त्यांच्या घरातून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले.
पुणे : नर्तकेच्या कार्यक्रमांवर आणि नाच-गाण्यावर पैसे उधळण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने मोठं कांड केलं. त्याने थेट आपल्या शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
६ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
फुरसुंगी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असं आहे. त्याने होळकरवाडी येथीलच रहिवासी आणि शेजारी असलेल्या अभिजित पठारे यांच्या घरी घरफोडी केली.
अभिजित पठारे हे विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना, राहुलने संधी साधून त्यांच्या घरातून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ६ लाख १४ हजार रुपये आहे. अभिजित पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
advertisement
गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस कर्मचारी सागर वणवे आणि अभिजित टिळेकर यांना बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. ही चोरी राहुल पठारे यानेच केली असून, त्याने चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विकले आहेत, असं त्यांना समजलं.
advertisement
पोलिसांनी राहुलला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने नर्तकीसोबतच्या बैठकीचा आणि नाच-गाण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती, म्हणून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी राहुल आणि फिर्यादी अभिजित हे एकाच परिसरात राहात असल्याने राहुलचे अभिजित यांच्या घरी येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : नर्तिकेवर पैसे उधळण्यासाठी पुण्यातील व्यक्तीचं कांड; शेजाऱ्याचं घर फोडून सहा लाखाची चोरी


