PCMC Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, कुणाला कुठे संधी? १२८ जागांचे आरक्षण एका क्लिकवर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढली गेली.
PCMC Election Reservation : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत चार टप्प्यात काढली गेली. मंगळवारी सकाळी 11 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोडत काढली गेली. पारदर्शक गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या. यामध्ये कोणाला लॉटरी लागलीये? खुल्या प्रवर्गासाठी किती जागा दिल्या गेल्या? जाणून घ्या.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढली गेली. आता आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांना निवडणूक लढण्यासाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका अशी असणार आरक्षित जागांची संख्या-
एकूण जागा - १२८
सर्वसाधारण - ७१
(महिला - ३५- पुरुष ३६)
advertisement
इतर मागास प्रवर्ग - ३४
(१७ महिला - १७ -पुरुष )
अनुसूचित जाती - २०
(१० महिला - पुरुष १०)
अनुसूचित जमाती - ०३
(०२ महिला - ०१ पुरुष)
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली गेली. निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल. अंदाजे जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी खालील प्रमाणे ३२ प्रभागात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे-
advertisement
प्रभाग क्रमांक १ – चिखली गावठाण – मोरेवस्ती
अ – ओबीसी राखीव
ब – महिलांसाठी
क – महिलांसाठी
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २ – बोऱ्हाडेवाडी – जाधववाडी – कुदळवाडी
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ३ – चऱ्होली- मोशी गावठाण – वडमुखवाडी – चोवीसावाडी – डूडूळगाव
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
advertisement
ब – ओबीसी
क – महिलांसाठी
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ४ – दिघी – बोपखेल
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ५ – गवळीनगर – चक्रपाणी वसाहत
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – ओबीसी
क – महिलांसाठी
advertisement
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ६ – धावडेवस्ती – भगत वस्ती – सद्गुरुनगर
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – ओबीसी
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ७ – भोसरी गावठाण – सॅन्डवीक कॉलनी
अ – ओबीसी
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ८ – इंद्रायणीनगर – गवळीमाथा – बालाजीनगर
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
advertisement
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ९ – नेहरूनगर – मासुळकर कॉलनी – खराळवाडी – गांधीनगर
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १० – शाहूनगर – संभाजीनगर – मोरवाडी – विद्यानगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
advertisement
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ११ – पूर्णानगर – कृष्णानगर – घरकुल प्रकल्प – अजंठानगर
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १२ – तळवडे गावठाण – रुपीनगर – त्रिवेणीनगर
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १३ – निगडी गावठाण – सेक्टर २२ – ओटास्किम – यमुनानगर
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १४ – चिंचवड स्टेशन – मोहननगर – रामनगर – काळभोरनगर – दत्तवाडी
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण – गंगानगर – वाहतूक नगरी
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १६ – मामुर्डी – किवळे – वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १७ – बिजलीनगर – प्रेमलोक पार्क – भोईरनगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १८ – चिंचवड गावठाण – केशवनगर – वेताळनगर
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १९ – उद्योगनगर – विजयनगर – भाटनगर – भाजी मंडई पिंपरी कॅम्प
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २० – संत तुकारामनगर – महात्मा फुलेनगर – लांडेवाडी – कासारवाडी
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २१ – पिंपरीगाव – मिलिंदनगर – जिजामाता रुग्णालय – वैभवनगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २२ – काळेवाडी विजयनगर – पवनानगर – ज्योतिबा नगर – नढेनगर
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २३ – थेरगाव गावठाण – पडवळनगर – साईनाथनगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क -महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २४ – थेरगाव दत्तनगर – गुजरनगर – आदित्य बिर्ला रुग्णालय
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २५ – वाकड – पुनावळे – ताथवडे
अ – अनूसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २६ – पिंपळे निलख – विशालनगर – कस्पटेवस्ती – वेणुनगर – रक्षक सोसायटी
अ – अनूसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २७ – काळेवाडी तापकीरनगर – रहाटणी गावठाण
अ – अनूसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २८ – पिंपळेसौदागर – रामनगर – कुणाल आयकॉन
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक २९ – पिंपळेगुरव – सुदर्शननगर – जवळकरनगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – अनूसूचित जमाती महिलांसाठी राखीव
क – ओबीसीसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ३० – दापोडी – फुगेवाडी – कासारवाडी
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव
क – ओबीसीसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ३१ – सांगवी विनायकनगर – गणेशनगर – उरो रुग्णालय
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
November 11, 2025 2:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PCMC Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, कुणाला कुठे संधी? १२८ जागांचे आरक्षण एका क्लिकवर


