Kolhapur Politics : राहुल गांधी 'हीन', तर मोदी 'विकासा'चं राजकारण करताहेत; धनंजय महाडिकांची थेट टिका!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur Politics : खासदार धनंजय महाडिक यांनी जीएसटी कपातीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींना...
Kolhapur Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची सवय लागली आहे, त्यांचे हीन राजकारण त्यांना लखलाभ होवो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहतील, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्यावर टीका केली. केंद्र सरकारने केलेल्या वस्तू व सेवा कर (GST) कपातीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जीएसटी कपातीचे फायदे
महाडिक म्हणाले की, जीएसटी कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग ठरेल. यामुळे वस्तूंचे दर कमी होतील, ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. याचा फायदा केवळ सामान्य जनतेलाच नाही, तर सरकारला अधिक कर मिळून विकासाची कामे अधिक वेगाने करता येतील. "पंतप्रधान मोदी यांनी 144 कोटी जनतेला दिवाळीचा बोनस दिला आहे," असेही ते म्हणाले.
advertisement
जनजागृतीचे आवाहन
भाजपचे कार्यकर्ते दुकानदार आणि विक्रेत्यांकडे जाऊन जीएसटी कपातीचे फायदे लोकांना समजावून सांगणारे फलक लावतील, तसेच स्वदेशी मालाची विक्री करण्याचे आवाहन करतील, असेही महाडिक यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक यांच्यासहीत अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा : 'आमदार आम्ही, तर 30+ जागाही आम्हालाच हव्यात', कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने सांगितला 'हक्क'
advertisement
हे ही वाचा : कोल्हापूरात भाजप-शिंदेसेनेत संघर्ष! 'जागावाटपा'वरून पेटला वाद, दोघांचा आकडा 78 वर; मग राष्ट्रवादीने करायचं काय?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Politics : राहुल गांधी 'हीन', तर मोदी 'विकासा'चं राजकारण करताहेत; धनंजय महाडिकांची थेट टिका!