Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरील टीका झोंबली, सरनाईकांनी भाजप मंत्र्याला सुनावलं, तुम्हाला एकच सांगतो...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समाचार घेऊन गणेश नाईकांना सुनावलं आहे.
Pratap Sarnaik Reply Ganesh Naik Over Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही,अशा शब्दात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समाचार घेऊन गणेश नाईकांना सुनावलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज माध्यमांशी बोलत होते.यावेळी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवर माध्यमांनी प्रताप सरनाईक यांना प्रश्न केला होता. यावर प्रताप सरनाईक म्हणाले, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे यांची जेवढी मेहनत आहे तेवढी मेहनत या राज्यात कोणताही नेता घेत नाही. तसेच या राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी सांगतो एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचा चेहरा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना लॅाटरी लागत नाही ते लोकांना लॅाटरी लावतात,असे सरनाईक म्हणाले आहेत.
advertisement
तसेच आम्ही 60 भक्कम त्यांचे अनुयायी आहोत.एकनाथ शिंदे साहेबांचा हिंदुत्व हे सगळ्या देशाला माहित आहे. या देशात कोणावर वाईट वेळ आली तर सर्वात आधी एकनाथ शिंदे पुढे असतात पार कश्मिर पासून कन्याकुमारी पर्यत,असे प्रताप सरनाईक म्हणाले होते.
वरिष्ठ नेत्यांनी संयमाने वागावं
गणेश नाईक यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय. एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं काय नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिले आहे. आम्ही विधानसभेला 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो.वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांविषयी असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं असे आमचे मत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
advertisement
महायुती तीन भाऊ असल्यामुळे त्यांच्यात थोड्याफार कुरघोड्या होणारच आहेत. तसेच संजय राऊत कोण होता छोट्या छोट्या कागदांवर रेखाटणाऱ्या माणसाला आमच्यामुळे खासदार होता आलं, असा चिमटा देखील त्याने यावेळी काढला.
गणेश नाईक यांच्या शिंदेंना चिमटा
पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, पण एकनाथ शिंदे यांना लागली, मात्र लागल्यानंतर ती योग्य टिकवता आलं पाहिजे, असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे महत्वाचं आहे, असे गणेश नाईक म्हणाले. विशेष म्हणजे गणेश नाईक बोलत असताना व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांचे पालघर चे आमदार राजेंद्र गावित आणि बोईसर चे आमदार विलास तरे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
advertisement
गणेश नाईक पुढे म्हणाले, 50 कोटी झाडे लावण्याच ठरवलं आहे. यावर्षी टार्गेट आहे 10 कोटी. गडचिरोलीला एक कोटी एक्स्ट्रा आहे आणि पालघरला 1 कोटी एक्स्ट्रा आहे. आता एवढी रोप आणणार कुठून.आता, 250 कोटी कुठून आणणार. त्याकरता टीश्यू कल्चरच्या पाच लॅब एक कोकणामध्ये पण एरीया आम्ही ठरवला नाही. कदाचित पालघर जिल्ह्याला ही संधी देऊन टाकून असे गणेश नाईक म्हणाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 16, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरील टीका झोंबली, सरनाईकांनी भाजप मंत्र्याला सुनावलं, तुम्हाला एकच सांगतो...









