Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील मानाच्या गणपतीचे दागिने कोण बनवतं? या दागिन्यांना परदेशातूनही मागणी

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींना फार महत्त्व आहे. या गणपतींच्या मूर्ती, वस्त्रं, सजावट आणि दागिन्यांना देखील विशेष महत्त्व आहे.

+
Ganesh

Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील मानाच्या गणपतीचे दागिने कोण बनवतं? या दागिन्यांना परदेशातूनही मागणी

पुणे: सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. शहरातील भव्य गणपती आणि ढोल-ताशांच्या गरजार निघणाऱ्या मिरवणुका जगप्रसिद्ध झाल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींना फार महत्त्व आहे. या गणपतींच्या मूर्ती, वस्त्रं, सजावट आणि दागिन्यांना देखील विशेष महत्त्व आहे. पुण्यातील नितीन करडे हे मागील 38 वर्षांपासून मानाच्या आणि इतर मंडळांच्या गणेश मूर्तीसाठी चांदीचे दागिने घडवण्याचं काम करतात. लोकल 18ने याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
नितीन करडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1963 साली त्यांचे वडील अनंत करडे यांनी परंपरागत दागिने घडवण्याचा व्ययसाय सुरू केला. वडिलांचा वारसा पुढे चालवत नितीन यांनी दागिने घडवण्याच्या व्यवसायाला मोठं स्वरूप प्राप्त करून दिलं. नितीन यांनी घडवलेल्या दागिन्यांना आणि अलंकारांना फक्त देशभरातूनच नव्हे, अमेरिका, मॉरिशस, जर्मनी अशा विविध देशांमधून मोठी मागणी असते.
advertisement
नितीन करडे मागील अनेक वर्षांपासून मानाच्या गणपतीसाठी चांदीचे दागिने घडवण्याचं काम करतात. त्यांनी घडवलेले मुकुट, हार, कंठी, कडे आणि कमरपट्टा अशा विविध अलंकारांमुळे गणेश मूर्तींचं रूप विशेष खुलतं. गणेशोत्सव काळात त्यांच्या दागिन्यांना मानाची गणपती मंडळं आणि इतर मंडळांकडून मोठी मागणी असते. करडे यांच्या दागिने तयार करण्याच्या प्रक्रियेत परंपरागत डिझाईन आणि आधुनिक गोष्टींचा संगम पाहायला मिळतो.
advertisement
दागिने घडवणे हे अतिशय कौशल्याचं काम आहे. त्यासाठी कारागिराच्या अंगी कलात्मकता, संयम आणि हातोटी लागते. दागिने तयार करण्यापूर्वी त्यांचं डिझाईन निश्चित केलं जातं. त्यानंतर दागिने घडवायाला सुरुवात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून नितीन करडे निष्णातपणे पुण्यातील अनेक गणपतींसाठी दागिने घडवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील मानाच्या गणपतीचे दागिने कोण बनवतं? या दागिन्यांना परदेशातूनही मागणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement