Pune MPSC Students Accident : सदाशिव पेठेत टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते, MPSC च्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune MPSC Students Accident : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ जणांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संध्याकाळी साडे पाच वाजता घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडल्याचे समजते. अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी MPSCची तयारी करणारे होते. या विद्यार्थ्यांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने भावे हायस्कूल जवळ १२ जणांना उडवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कॅब चालकाने मद्यप्राशन केले होते. चालक हा पुण्याचा असून त्याचे नाव जयराम शिवाजी मुळे असे आहे. तो समर्थ नगर कॉलनी बिबेवाडी येथील रहिवासी आहे.
नेमके काय घडले?
शनिवारी सायंकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ असलेल्या नाथसाई या चहाच्या दुकानात सर्व विद्यार्थी चहा घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या टुरिस्ट गाडी हुंडाईने या १२ जणांना उडवले. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.
advertisement
पुण्याच्या विविध रुग्णालयांत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
या घटनेत काही विद्यार्थी गंभीर तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 31, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune MPSC Students Accident : सदाशिव पेठेत टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते, MPSC च्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले


