Pushpak Express Accident : नातवंडांचा चेहरा फक्त VIDEO कॉलवर पाहता आला,आजीसह एकाच घरातील 4 जणांचे फक्त तुकडेच आले!

Last Updated:

आजी जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता.पण त्यानंतर फोन आला तो...

(भिवंडीतील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू)
(भिवंडीतील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू)
भिवंडी :महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बुधवारी पाचोरा स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेनं घाबरून काही प्रवाशांनी चेन खेचून रेल्वे थांबवली आणि या गदारोळात घाबरलेल्या काही प्रवाशांनी रेल्वेतून उतरले याच वेळी समोरील ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत अनेक जण चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.या घटनेत भिवंडीतील जयगडी आणि पुण्यातील विश्वकर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या दोन्ही कुटुंबातील नऊ सदस्य नेपाळवरून लखनऊला येऊन तेथून पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणकडे येत होते मात्र रस्त्यात झालेल्या अपघातात या कुटुंबातील 4 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
जयकला जयगडी या 60 वर्षीय महिला मूळच्या नेपाळ देशातील आहेत. त्यांचा मुलगा भिवंडीतील इमारतीवर वॉचमन म्हणून काम करत असून येथेच ते कुटुंबीयांसह राहत आहे. जयकला या भिवंडी येथे आपल्या नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी आणि आपल्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी येत होत्या. भिवंडीत येऊन प्रथमच येऊन नातवंडांना भेटणाऱ्या आजी जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता.पण त्यानंतर फोन आला तो त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीचा. आपली आजी भेटणार यामुळे भिवंडीतील जयगडी कुटुंब आनंदी असतानाच आजीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि जयगडी कुटुंबावर एकच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
तर दुसरीकडे याच कुटुंबाबरोबर नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थान मधील विश्वकर्मा कुटुंब पुण्यातील इंद्रायणी नगर सद्गुरु कंपनीत काम करतं होते. या दुर्घटनेतील मयत नन्ना विश्वकर्मा 55 हे या कंपनीत काम करायचे. त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा 45 या मुतखड्याच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना देखील उपचारासाठी ते गावाहून आपल्यासोबत घेऊन निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा हेमंत विश्वकर्मा वय 11 वर्ष हा देखील येत होता. तसंच त्यांच्या कुटुंबीयातील इतर तीनजण असे विश्वकर्मा कुटुंबातील सहा जण येत असताना या कुटुंबातील नन्ना विश्वकर्मा, मैश्रा विश्वकर्मा आणि हेमंत विश्वकर्मा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामधील मयत मैश्रा विश्वकर्मा व हेमंत विश्वकर्मा हे पहिल्यांदा येत होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर कळणे झडप घातली आहे. हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असून या दुर्दैवी घटनेने या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा दोन कोसळला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pushpak Express Accident : नातवंडांचा चेहरा फक्त VIDEO कॉलवर पाहता आला,आजीसह एकाच घरातील 4 जणांचे फक्त तुकडेच आले!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement