Weather Update: मोंथा गेला तरी संकट कायम! विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा पावसाचा इशारा; पुढचे ३६ तास महाराष्ट्रसाठी महत्त्वाचे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. सुप्रित यांच्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, कोकण, गुजरातमध्ये कमी दाब, मोंथा चक्रीवादळामुळे पाऊस व वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अलर्ट जारी.
Weather Update: हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पूर्व विदर्भ, दक्षिण छत्तीसगड आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झालं. मालवण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विदर्भावर कमी दाबाचा पट्टा
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळाचं लॅण्डफॉल झाल्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झालं आहे. विदर्भाच्या काही भागांवर याचा परिणाम झाला आहे. तर सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील तयार झालं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, गुजरातच्या दिशेनं देखील डिप डिप्रेशन येत आहे. त्यामुळे वादळी वारे वेगाने सुटले आहेत. पुढचे 36 तास महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पुन्हा उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 48 तास पावसाचे असणार आहेत.
advertisement
3 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळ कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस राहणार आहे. मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तळ कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कमी होणार असला तरी हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
advertisement
महाराष्ट्रात अवकाळी पावसानं मोठं नुकसान
निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केला. नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आला आहे. या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकच्या सुरगाणा भागात होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसला आहे. काढणीला आलेलं पिक आडवं झालं. पावसाने शेतातील भात पिक भिजून खराब झालं आहे. नांदेड जिल्हाला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. आज सकाळ पासून जिल्हयात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामूळे नदी नाल्यांना पूर आला होता.
advertisement
मोंथामुळे कोकणात मोठं नुकसान
view commentsमोंथा चक्रीवादळाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भातशेती पाण्याखाली गेली असून कापणीला आलेल्या पिकाला फटका बसला आहे. वाशिमच्या मालेगाव,रिसोड, मानोरा,मंगरुळपीरसह इतर भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा कपाशी आणि तुरीला मोठा फटका बसला. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 7:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: मोंथा गेला तरी संकट कायम! विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा पावसाचा इशारा; पुढचे ३६ तास महाराष्ट्रसाठी महत्त्वाचे


