दीड लाखासाठी शेतकरी नवरा-बायकोचं टोकाचं पाऊल, अमित शाहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटी खर्च, राजू शेट्टींची तोफ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कर्जापायी परभणीच्या सचिन बालाजी जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीनेही विष घेत आत्महत्या केली.
कोल्हापूर: सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणीच्या सचिन बालाजी जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीनेही विष घेत आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला जोरदार लक्ष्य केले आहे.
दीड लाखासाठी शेतकरी नवरा-बायकोची आत्महत्या
एकीकडे परभणी जिल्ह्यातील सचिन जाधव हा शेतकरी दीड लाख रुपये कर्ज झाले म्हणून स्वतः आत्महत्या केली. ते पाहून त्याच्या पत्नीनेही सांगकळी आत्महत्या केली. त्याची पत्नी सात महिन्याची गर्भवती होती म्हणूनच सरकारने दीड लाखाच्या कर्जासाठी तीन निष्पाप जीवांचा बळी घेतला.
दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आल्यानंतर सुनिल तटकरे यांच्या घरी १ वाटी आमरस आणि १ मोदक खाण्यासाठी सरकारी खर्चातून दीड कोटी रुपयाचे हेलिपॅड बांधण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळला असता तर परभणी येथील शेतकरी व ७ महिन्याच्या गरोदर पत्नीचा जीव वाचला असता, अशी तोफ राजू शेट्टी यांनी डागली. राज्य शासनाने कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
— Raju Shetti (@rajushetti) April 21, 2025
कर्ज कसे फेडायचे, दाम्पत्याचे टोकाचे पाऊल
सचिन जाधव याने माळसोन्ना शिवारातील शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज काढले होते. बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तणावाखाली येऊन त्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी ज्योती हिने देखील विष घेतले.
advertisement
अमित शाहांसाठी दीड कोटींचे हेलिपॅड
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी रायगड दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खासदार सुनील तटकरे यांच्या आग्रहाखातर त्यांच्या सुतारवाडीतील घरी स्नेहभोजनासाठी गेले. रायगडावरून थेट सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने गेले. सुतारवाडीत हेलिपॅड करण्यासाठी जवळपास १ लाख ३९ लाखांचा खर्च आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तटकरेंच्या आग्रहाखातर आणि शाहांच्या जेवणासाठी सरकारी तिजोरीवर भार कशासाठी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित करून संताप व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 21, 2025 8:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दीड लाखासाठी शेतकरी नवरा-बायकोचं टोकाचं पाऊल, अमित शाहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटी खर्च, राजू शेट्टींची तोफ


