Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर 'रँचो'कडून महिलेची प्रसुती, बाळाच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती

Last Updated:

Ram Mandir Stiaton : मुंबईतील राममंदिर रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी धाडसी तरुणाने एका महिलेची प्रसूती केली.मात्र सध्या त्याच बाळाच्या आरोग्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.

News18
News18
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राममंदिर स्टेशनवर झालेली प्रसूती ही घटना मुंबई शहरात नाही तर देशभरात धक्कादायक ठरली आहे. काही दिवसांपूर्वी एका सामान्य प्रवाशाच्या हातून अत्यंत असामान्य परिस्थितीत महिलेची प्रसुती करण्यात आली. ज्या प्रवाशाचे नाव विकास बेद्रे असून जो स्वतः सिनेमॅटोग्राफर आहे आणि हे त्याने सर्व एका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन केले गेले. या धाडसी आणि साहसी कृतीमुळे लाखो लोकांमध्ये कौतुकाची लाट उठली आणि राजकीय नेत्यांनीही त्याला गौरवले.
प्रसूती झाली अन् रुग्णालयात पोहोचल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर
परंतु या धक्कादायक प्रसूतीच्या नंतर एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जी की जन्मानंतरच बाळाच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. ही बातमी ऐकून अनेकांना खूप दुःख झालं. स्टेशनवर प्रसूतीनंतर त्या महिलेला ताबडतोब महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि बाळाच्या हृदयात असलेले हे लक्षात आले. या हृदयाच्या छिद्रामुळे त्याच्या आरोग्यावर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
advertisement
प्रसुती झालेल्या महिलेने प्रसूतीपूर्वी नायर रुग्णालयात तपासणी करून घेतली होती, जिथे या दोषाची माहिती मिळाली होती. डॉक्टरांनी सांगितले की सध्या तत्काळ उपचाराची गरज नाही, परंतु भविष्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. या धक्कादायक परिस्थितीतही विकास बेद्रे आणि महिला डॉक्टर देविका देशमुख यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे बाळाचे आणि आईचे जीवन सुरक्षित राहिले.
advertisement
सामाजिक माध्यमांवर ही घटना प्रचंड व्हायरल झाली. लाखो लोकांनी तरुणाचे साहस कौतुक केले, तरी बाळाच्या हृदयातील छिद्रामुळे लोकांच्या मनात काळजी आणि हळहळ देखील निर्माण झाली. या घटनेमुळे मानवी जीवनाची नाजूकता, साहसाची ताकद आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका उभी राहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर 'रँचो'कडून महिलेची प्रसुती, बाळाच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement