Navi Mumbai Fire : वाशीतील रहेजा रेसिडेन्सीच्या 10 मजल्यावर भीषण आग, चौघांची प्रकृती गंभीर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Navi Mumbai Fire : इमारतीमधील एका घराला आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
वाशी : नवी मुंबईतील सेक्टर 14 येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगच्या 10व्या मजल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग भडकली. इमारतीमधील एका घराला आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्यांसह पनवेल महापालिका व एमआयडीसी अग्निशमन दल देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. आग इतकी भीषण होती की, वरच्या मजल्यांपर्यंत धूर पसरल्याने काही रहिवाशांना बाहेर पडण्यासाठी अडथळे निर्माण झाले. सदर घटनेत 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement
ठाण्यातील हिरानंदानी टॉवरमध्ये लागली आग...
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इथं एका सोसायटीच्या इमारतीला सोमवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच हिरानंदानी टॉवरमधील व्यवस्थपाकाकडून तातडीने मदतकार्य सुरू झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
मुंबईतील कफ परेडमध्ये आग, एकाचा मृत्यू...
advertisement
मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगरमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने हाहाकार माजवला. या दुर्घटनेत 15 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन दिवाळीतच आग लागल्याने जीवितहानी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. कॅप्टन प्रकाश पेठे मार्गवरील मच्छिमार नगरमधील चाळीच्या पहिल्या मजल्यावर सोमवारी पहाटे साधारण 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 21, 2025 8:26 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Navi Mumbai Fire : वाशीतील रहेजा रेसिडेन्सीच्या 10 मजल्यावर भीषण आग, चौघांची प्रकृती गंभीर