फलटणच्या विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल,रामराजे नाईक निंबाळकरांचं मोठं विधान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल, असे सूचक विधान माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
Satara News : फलटणचे भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सध्या सूरू आहेत. या चर्चेदरम्यानच आता मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल, असे सूचक विधान माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
फलटणचे भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या काळात दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रथमच रामराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्याकडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाबाबत वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाहीतर होणार नाही,असे सांगत दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांचीही भूमिकाही महत्वाची असल्याचे स्पष्ट केले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटणच्या विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल,रामराजे नाईक निंबाळकरांचं मोठं विधान