Ration Card : 30 जून पूर्वी करा 'हे' काम, नाहीतर लिस्टमधून कमी होईल नाव, फ्री योजनांचा मिळणार नाही लाभ

Last Updated:

सरकारकडून राशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि फसवणुकीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व पात्र नागरिकांसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य केलं आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : राशनकार्ड हे प्रत्येकासाठी महत्वाचा दस्ताऐवज आहे. ज्याचा वापर अनेक सरकारी कामांमध्ये होतो. भारत सरकारकडून राशनकार्ड धारकांसाठी मोठी आणि उपयुक्त माहिती समोर आली आहे. जर अजूनही तुम्ही तुमच्या राशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर ही प्रक्रिया 30 जून 2025 च्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा, तुमचं नाव राशन योजनेतून वगळलं जाऊ शकतं आणि तुम्हाला मोफत किंवा सवलतीचा राशन मिळणं थांबेल.
ई-केवायसी का गरजेची आहे?
सरकारकडून राशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि फसवणुकीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व पात्र नागरिकांसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य केलं आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याची ओळख आधार कार्डाशी लिंक करून पडताळणी केली जाते.
यामुळे सरकारकडून खोटे किंवा अपात्र राशन कार्ड धारकांना योजनेपासून वगळता येणार असून, केवळ पात्र कुटुंबांनाच लाभ मिळणार आहे.
advertisement
पूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मार्च 2025 होती, परंतु आता ती 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक संधी आहे.
जर नाव राशन लिस्टमधून कापलं गेलं असेल तर?
जर तुम्ही आधीच ई-केवायसी केली असेल आणि तरीही तुमचं नाव अपात्र म्हणून यादीतून वगळलं गेलं असेल, तर लगेच स्थानिक रेशन दुकान, अन्न आणि नागरी पुरवठा कार्यालयात संपर्क करा. सोबत तुमचा आधार कार्ड, मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रं घेऊन जा आणि पुन्हा अर्ज करा.
advertisement
ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?
ऑनलाइन पद्धत:
राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाइटवर जाऊन ई-केवायसीसाठी लॉगिन करा.
आधार क्रमांक आणि OTP चा वापर करून प्रक्रिया पूर्ण करा.
ऑफलाइन पद्धत:
जवळच्या रेशन दुकानात किंवा सरकारी केंद्रात जा.
आधार कार्ड, मोबाइल नंबरसह उपस्थित राहा आणि बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी पूर्ण करा.
राशन कार्डवर मोफत धान्य मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास तुमचा लाभ बंद होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ration Card : 30 जून पूर्वी करा 'हे' काम, नाहीतर लिस्टमधून कमी होईल नाव, फ्री योजनांचा मिळणार नाही लाभ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement