Ratnagiri Rain Updates : चिपळूणमध्ये हाहाकार! खेरडी गाव पाण्याखाली, 5 हजार लोक अडकले, मदतीसाठी आक्रोश

Last Updated:

Ratnagiri Rain Updates :

चिपळूणमध्ये हाहाकार! खेरडी गाव पाण्याखाली, 5 हजार लोक अडकले, मदतीसाठी आक्रोश
चिपळूणमध्ये हाहाकार! खेरडी गाव पाण्याखाली, 5 हजार लोक अडकले, मदतीसाठी आक्रोश
राजेश जाधव, प्रतिनिधी, चिपळूण-रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील खेरडी गावातील माळेवाडी परिसरात पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 70 ते 80 इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. या इमारतीमधील आणि परिसरातील 4 ते 5 हजार लोक या पाण्यात अडकले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांचा हालअपेष्टा सुरू झाल्या आहेत. फक्त एकाच बोटीने बचाव कार्य सुरू आहे.
या बिकट परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी स्वतःच्या प्रयत्नाने एकमेव बोट वापरून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. पवार यांच्या बोटीच्या मदतीने काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असले तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक अडकल्याने अद्याप बचावकार्य अपुरे ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडे वारंवार मागणी करूनही खेर्डीसाठी पूरस्थितीत आवश्यक बोट उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
advertisement
दरम्यान, दुसरीकडे नगरपरिषदेकडे पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी बोटीची मागणी करण्यात आली होती. मात्र, नगरपरिषदेने कोणताही प्रतिसाद नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. "नगरपरिषदेकडे विनंती करूनही त्यांनी आमच्या मागण्यांकडे कानाडोळा केला," असा आरोप गावकऱ्यांनी केला. गावात अन्न व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.
advertisement

कोकणात पावसाचा हाहाकार

गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषता रत्नागिरीतील प्रमुख नऊ नद्यांपैकी सहा नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. काजली नदीने इशारा पातली ओलांडल्यामुळ अंजनारी येथील स्वयंभू दत्त मंदिरात पाणी शिरले आहे . तसेच अनेक सखल भागात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. आज रत्नागिरी जिल्हाला रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri Rain Updates : चिपळूणमध्ये हाहाकार! खेरडी गाव पाण्याखाली, 5 हजार लोक अडकले, मदतीसाठी आक्रोश
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement