आंदोलनाची ठिणगी पेटली, रोहित पवार यांच्याकडून प्रतिकात्मक EVM मशीनची होळी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला लोकसभेच्या तुलनेत मोठा फटका बसलाय. या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मुळे मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला फटका बसल्याचा आरोप महाविकास आघाडीतून केला जात आहे, ईव्हीएम च्या विरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाले असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.
पाथर्डीमध्ये ॲड. प्रतापकाका ढाकणे यांनी आयोजित केलेल्या आभार मेळाव्याला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि येणाऱ्या निवडणुकीत जनमताचं प्रतिबिंब निकालात उतरवायचं असेल तर अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेवगाव-पाथर्डीच नाही तर एकूणच राज्यातील विधानसभेच्या निकालाबाबत मतदारांमध्ये अनेक शंका आहेत. त्यामुळं महायुतीला मिळालेला हा विजय जनतेचा कौल नाही तर ईव्हीएमच्या माध्यमातून चोरलेला निकाल असल्याची लोकभावना आहे. त्यामुळेच पाथर्डी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
प्रतापकाका ढाकणे यांच्या आभार मेळाव्याला शिवशंकर राजळे, हरिश भारदे, राणीताई लंके, नासिरभाई शेख, बंडू पाटील बोरुडे, योगिताताई राजळे, सिताराम बोरुडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका
महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारलेला आहे. जनमताचा कौल ईव्हीएमविरोधात असून त्यांनी दिलेल्या मतांचे प्रतिबंब निकालात उमटलेले नाही, असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ईव्हीएमविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ईव्हीएम लोकांना नको असेल तर सत्ताधाऱ्यांची बळजबरी कशाला, असा सवाल ते विचारत आहेत. मविआच्या अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी आयोगाकडे पैसे भरले आहेत.
advertisement
अनेक मतदारसंघातले निकाल धक्कादायक असल्याची तक्रार घेवून राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांच्याकडे गेल्यानंतर पवार यांनी वकिलांची टीम फौज तयार केली आहे तर कुणीही मागे हटू नका असे सांगत ठाकरे गट आणि काँग्रेसनेही ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर बोट ठेवले आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 01, 2024 5:47 PM IST


