advertisement

चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं, विरोधकांनी निशाणा साधत केली अटकेची मागणी

Last Updated:

चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण पेटलंय. सरकारला घेरण्याची आयतीचं संधी विरोधकांना चालून आली आहे.

Ashok Kharat Case Rupali Chakankar
Ashok Kharat Case Rupali Chakankar
मुंबई :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
वासनांध अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यामुळे चाकणकरांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर शुक्रवारी चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपुर्त केला. पण आता चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण पेटलंय. सरकारला घेरण्याची आयतीचं संधी विरोधकांना चालून आली आहे.
advertisement
रुपाली चाकणकरांच्या एकेकाळच्या सहकारी आणि शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या रोहणी खडसेंनीही चाकणकरांवर जोरदार निशाणा साधलाय. गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल... म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल! माझी मुख्यमंत्री महोदय, सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch...अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे.
advertisement

 महिला नेत्यांमध्ये सामना रंगला

रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय..त्यामुळे आता या प्रकरणात चाकणकरांवरही कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात आलीय. सोमवती अमावस्येला रुपाली चाकणकर यांनी बोट कापलं होतं असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. या प्रकरणी सुषमा अंधारेंविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा चाकणकरांनी दिलाय .त्यावरून या दोन्ही महिला नेत्यांमध्ये सामना रंगला आहे.
advertisement
एकीकडं भोंदू अशोक खरातचे विकृत कारनामे उघड झालेत तर दुसरीकडं त्याच्या सोबत सत्ताधारी नेत्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी उत्तर देताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. अशोक खरातनं अनेक असहाय्य महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पोलिसांना संशय आहे. म्हणूनचं एसआयटी मार्फत त्याची चौकशी केली जात आहे.. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर असताना रुपाली चाकणकर विकृत अशोक खरातच्या पाया पडताना, त्याचं औक्षण करताना, खरातच्या डोक्यावर छत्री घेताना अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत,  यातून रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलाय. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणाचा वाद शमत नसल्याचं दिसून येतंय,
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं, विरोधकांनी निशाणा साधत केली अटकेची मागणी
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement