'6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा', संभाजी भिडेंचं मोठं विधान
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आपल्या वादग्रस्त विधानासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी कोल्हापुरात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
कोल्हापूर: आपल्या वादग्रस्त विधानासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी कोल्हापुरात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बरखास्त करायला हवा, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील वाघ्या श्वानाच्या पुतळ्याबाबत देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.
खरं तर, महाराष्ट्रात आधीच शिवाजी महाराजांची जयंती जन्मतारखेनुसार करायची की तिथीनुसार करायची? यावरून मागील अनेक वर्षांपासून वाद आहे, असं असताना आता राज्याभिषेक सोहळ्यावरून संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून महाराष्ट्रात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
शिवराज्याभिषेक सोहळ्यासह संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत देखील वक्तव्य केलं. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको. या कुत्र्याचं राजकारण करू नये. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात, ते कोणत्या उंचीचे आहेत. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करावं. त्यानंतर निर्णय घ्यावा, असंही भिडे म्हणाले.
view commentsLocation :
kolha
First Published :
May 23, 2025 2:12 PM IST


