Sangamner Municipal Council Election Result 2025 : खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sangamner Municipal Council Election Result 2025 : गमनेर नगरपालिकेत विद्यमान आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजीत तांबे आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील संगमनेर नगरपालिकेच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. संगमनेर नगरपालिकेत विद्यमान आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजीत तांबे आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत थोरातांना पराभवाचा धक्का बसल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ, तर विरोधी संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्यात थेट लढत आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवकपदापेक्षा नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
संगमनेर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार मैथिली तांबे यांनी आघाडी घेतली आहे. मैथिली तांबे यांनी पहिल्याच फेरीत ७७० मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर मैथिली तांबे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मैथीली तांबे यांनी 3015 मतांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्याशिवाय, संगमनेर सेवा समीतीचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.
advertisement
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड करण्यास तांबे-थोरात गट प्रयत्नशील असणार आहेत. तर, दुसरीकडे विधानसभाच्या निवडणुकीच्या विजयाची लाट कायम ठेवण्यास खताळ आणि महायुतीने जोर लावला होता.
view commentsLocation :
Sangamner,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangamner Municipal Council Election Result 2025 : खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर










