होळीला करा सुपरफास्ट प्रवास, मिरजमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Holi Special Train: होळीसाठी भारतीय रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिरजमार्गे 2 सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहेत.
सांगली: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. आता लवकरच होळीचा सण आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हुबळी विभागातून म्हैसूर ते जोधपूर आणि बंगळुरू ते गोरखपूर विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्या मिरज मार्गे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीये. त्यामुळे मिरजमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
म्हैसूर ते जोधपूर एक्स्प्रेस
म्हैसूर ते जोधपूर एक्स्प्रेस क्रमांक 06733 ही विशेष गाडी दि. 10 व 17 मार्च रोजी रात्री 9:20 मिनिटांनी म्हैसूर येथून निघेल व जोधपूर येथे गुरुवारी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल. ही गाडी परतीसाठी दि. 14 व 21 मार्च रोजी गाडी क्रमांक 06534 जोधपूर येथून रात्री 11:00 वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सायंकाळी 4:40 वाजता म्हैसूर येथे पोहोचेल. ही गाडी बेळगाव, मिरज, पुणे मार्गे जोधपूरला जाईल.
advertisement
बंगळुरु ते गोरखपूर एक्स्प्रेस
view commentsबंगळुरु ते गोरखपूर विशेष एक्स्प्रेस क्रमांक 06429 ही गाडी दि. 14 व 21मार्च रोजी सायंकाळी 7:00 वाजता बंगळुरु येथून सुटेल व गोरखपूर येथे गुरुवारी सायंकाळी वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी विशेष गाडी क्रमांक 06530 गोरखपूरहून दि.14 व 21मार्च रोजी सायंकाळी 5:00 वाजता सुटेल व सोमवारी सकाळी 8.15 मिनिटांनी बंगळुरुला पोहोचेल. ही गाडी बेळगाव, मिरज, सातारा, पुणे मनमाड, खाडवा, प्रयागराज, वाराणसी या मार्गे धावेल.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
March 09, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
होळीला करा सुपरफास्ट प्रवास, मिरजमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक


