advertisement

सांगलीच्या विद्यार्थिनी सुरक्षित! 'गाव ते शाळा' बससेवेसाठी आता महिला कंडक्टरची नियुक्ती; प्रवास होणार बिनधास्त

Last Updated:

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी एसटी महामंडळाने 'गाव ते शाळा' या बससेवेसाठी महिला वाहकांची नियुक्ती करण्याचे...

Sangli News
Sangli News
सांगली : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना 12 वीपर्यंतचे शिक्षण कोणत्याही अडथळ्याविना घेता यावे यासाठी, 'गाव ते शाळा' या बससेवेला एसटी महामंडळाने अधिक सुरक्षित बनवले आहे. या शालेय बसफेऱ्यांसाठी आता महिला वाहक (कंडक्टर) नेमण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व एसटी आगारांमध्ये 171 महिला वाहक कार्यरत असून, बहुसंख्य महिला वाहकांची नियुक्ती शालेय बसफेऱ्यांसाठीच करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय मुली, महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बसस्थानक परिसरात आणि बसमध्ये मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार घडत होते. अनेक मुली हा त्रास सहन करतच शिक्षण घेत होत्या. पण, आता राज्यातील काही घटनांनंतर मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
शिक्षणाला प्रोत्साहन आणि पालकांना दिलासा
महिला वाहकांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातून शहरात शाळा-कॉलेजसाठी येणाऱ्या मुली-युवतींना एक विश्वास मिळाला आहे. यामुळे पालकही आता बिनधास्तपणे आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहेत.
advertisement
  • कधीपासून बससेवा? : 'गाव ते शाळा' बससेवा 2012 पासून सुरू आहे.
  • जिल्ह्यात हजारो विद्यार्थिनी : जिल्ह्यातील दहा एसटी आगारांतून हजारो विद्यार्थिनी या बससेवेचा लाभ घेतात.
  • 171 महिला वाहक : जिल्ह्यातील दहा एसटी आगारांत 171 महिला वाहक कार्यरत आहेत.
  • मोफत प्रवास : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत 12 वीपर्यंतच्या मुलींना मोफत बसपास दिला जातो.
advertisement
'पोलीस काका/पोलीस दीदी' संकल्पना 
मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत 'पोलीस काका/पोलीस दीदी' ही संकल्पना राबवली जात आहे. पोलीस अधिकारी अधून-मधून बसमधून प्रवास करतात, ज्यामुळे मुलींना दिलासा मिळतो आणि टवाळखोरांना आळा बसतो.
view comments
मराठी बातम्या/सांगली/
सांगलीच्या विद्यार्थिनी सुरक्षित! 'गाव ते शाळा' बससेवेसाठी आता महिला कंडक्टरची नियुक्ती; प्रवास होणार बिनधास्त
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement