सांगलीच्या थकबाकीदारांनो, सावध व्हा! मालमत्ता होणार सील, चौकात झळकणार नावं, 94 कोटी वसुलीसाठी महापालिकेची मोहीम

Last Updated:

सांगली महापालिकेने 94 कोटी रुपयांच्या थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी कठोर मोहीम सुरू केली आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार...

Sangli Municipal Corporation
Sangli Municipal Corporation
सांगली : महापालिकेने थकीत 94 कोटी रुपयांच्या घरपट्टी वसुलीसाठी आता कंबर कसली आहे. महापालिकेने 50 हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या 2095 मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर, 5 हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या 34, 195 मालमत्ताधारकांनाही नोटिसा पाठवण्यात येत आहेत. आज (दि. ६ ऑगस्ट) पासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी 10 मालमत्ता सील केल्या जाणार आहेत. इतकंच नाही, तर मोठ्या थकबाकीदारांची नावे शहराच्या प्रमुख चौकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत.
94 कोटींची थकबाकी, विकासकामांवर परिणाम
महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराचे तब्बल 94 कोटी रुपये थकीत आहेत. वेळोवेळी नोटिसा देऊनही मालमत्ताधारकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली, ज्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आणि त्याचा परिणाम नागरी सेवा व विकास कामांवर होऊ लागला. त्यामुळेच, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घरपट्टी वसुलीसाठी ही कठोर मोहीम सुरू केली आहे.
advertisement
'थकबाकी भरा, अन्यथा...'
आयुक्त सत्यम गांधी यांनी थकबाकीदार मिळकतधारकांना त्वरित त्यांची थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने नागरी सेवा आणि इतर विकास कामांवर परिणाम होत आहे, त्यामुळे थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झाली आहे." आजपासूनच (बुधवारपासून) मालमत्ता सील करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिली. पहिल्या दिवशी 10 मालमत्ता सील करण्याचे नियोजन आहे.
advertisement
अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले की, "जप्ती व वसुलीसाठी भागनिहाय पथकेही नेमण्यात आली आहेत. कर भरून जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी", असे आवाहनही त्यांनी केले. तर सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी सांगितले की, "मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कठोर कार्यवाही केली जाईल. यामध्ये मालमत्ता जप्त करणे, प्रसंगी लिलाव करणे, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे आणि थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे यांसारख्या कार्यवाहीचा समावेश आहे."
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीच्या थकबाकीदारांनो, सावध व्हा! मालमत्ता होणार सील, चौकात झळकणार नावं, 94 कोटी वसुलीसाठी महापालिकेची मोहीम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement