बहिणीसाठी 11 वर्षाचा शिवम थेट बिबट्याला भिडला, मृत्यूच्या दाढेतून कशी केली सुटका? सांगलीतला थरार

Last Updated:

Sangli Leopard: बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमाता शिवमने तत्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले.

Sangli Leopard: मृत्यूच्या दाढेतून बहिणीची सुटका, अकरा वर्षाचा चिमुकला थेट बिबट्याला भिडला, सांगलीत थरार
Sangli Leopard: मृत्यूच्या दाढेतून बहिणीची सुटका, अकरा वर्षाचा चिमुकला थेट बिबट्याला भिडला, सांगलीत थरार
सांगली: एकमेकांसाठी जीवाची पर्वा न करणारे बहिण-भाऊ आपण नेहमी पाहतो. असाच काहीसा थरार सांगलीतील शिराळ्यात घडला. बहिणीला वाचवण्यासाठी चिमुकला भाऊ थेट काळाला भिडला. त्याचं झालं असं की, एक बिबट्या नऊ वर्षीय बहिणीवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अकरा वर्षाचा भाऊ थेट बिबट्याला भिडला आणि बहिणीला अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले. बहिणीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याला भिडणाऱ्या चिमुकल्या शिवमच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
असा घडला थरार
संग्राम पाटील यांचे कुटुंब शिराळा तालुक्यातील उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री जेवून शिवम आणि स्वरांजली एकमेकांचे हात पकडून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. त्यावेळी दोन्ही घरांच्या मध्ये बोळात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली.
advertisement
भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव
बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमगता शिवमने तत्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दोघेजण बरेच अंतर फरफटत गेले, मात्र शिवमने तिचा पाय सोडला नाही. दरम्यान, मुलांची आई स्वप्नाली यांनी बाहेर पाहिले. बिबट्या पोटच्या गोळ्याची शिकार करताना पाहताच आईने काळीज विरघळून टाकणारे किंचाळली. तेव्हा शेजारी जमा झाल्याचे पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधारात पळ काढला. सुदैवाने स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत रुतले नाहीत.
advertisement
या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील गायकवाड, श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. नीलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
advertisement
स्वेटर आणि टोपी ठरली सुरक्षा कवच
थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्याने तिच्या मानेवर झडप घातली. परंतु टोपी आणि स्वेटरमुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही. भावाचे शौर्य आणि हे कपडे तिच्यासाठी जीवनदान ठरले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
बहिणीसाठी 11 वर्षाचा शिवम थेट बिबट्याला भिडला, मृत्यूच्या दाढेतून कशी केली सुटका? सांगलीतला थरार
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement