Sangli ST Bus : महाराष्ट्रात महिला असुरक्षित? धावत्या शिवशाहीत तरुणीसोबत अश्लील चाळे, सांगलीतील धक्कादायक घटना
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sangli Crime :पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली: महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणऱ्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. बस थांबल्यानंतर तरुणीने याची तक्रार बस वाहक आणि प्रवाशांना सांगितला.
एक 24 वर्षीय तरुणी पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करत होती. यावेळी बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तरुणी भयभीत झाली होती. आष्टा ते सांगलीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. अखेर एसटी बस स्टँडवर थांबल्यानंतर तरुणीने हा सगळा प्रकार बस वाहक आणि प्रवाशांना सांगितला. त्यावेळी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रवाशांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे (वय 34 रा. दुधारी मारुती मंदिर जवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
advertisement
या प्रकरणी तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एसटी बसमधील प्रवास महिलांसाठी सुरक्षित समजला जातो. मात्र, सांगलीतील या घटनेने आता एसटी देखील असुरक्षित झालीय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वारगेट प्रकरण ताजे असताना शिवशाहीमध्ये अशी घटना घडल्यानंतर पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यात संपाताची लाट उसळली. पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला 70 तासानंतर अटक करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
March 07, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli ST Bus : महाराष्ट्रात महिला असुरक्षित? धावत्या शिवशाहीत तरुणीसोबत अश्लील चाळे, सांगलीतील धक्कादायक घटना


