जाहिरातीचा वाद धमकी आणि इशाऱ्यापर्यंत, राजेश मोरेंच्या धमकीला राऊतांचं प्रत्युत्तर, येऊन तर बघ...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजुला असण्यावरुन संजय राऊतांनी तोफ डागलेली. याच मुद्द्यावरुन शिंदेंची सेना आक्रमक झाली आणि घरात घुसून मारू, असा थेट धमकीवजा इशारा राऊतांना देण्यात आला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची एक जाहिरात सध्या महाराष्ट्रात दोन पक्षांमधल्या वादाचं कारण ठरलीये. एकनाथ शिंदेंनी दिलेल्या या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो बाजूबाजूला छापल्याने संजय राऊतांनी आक्षेप घेतला. याच आक्षेपावरुन सुरु झालेलं राजकारण आता धमक्या आणि इशाऱ्यांपर्यंत पोहोचलंय.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजुला असण्यावरुन संजय राऊतांनी तोफ डागलेली. याच मुद्द्यावरुन शिंदेंची सेना आक्रमक झाली आणि घरात घुसून मारू, असा थेट धमकीवजा इशारा राऊतांना देण्यात आला. पण संजय राऊतांना शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेल्या धमकीचे जोरदार पडसाद उमटले. मोरेंच्या धमकीला प्रत्युत्तर देण्यासाठी राऊत समर्थक पुढे सरसावले. धमकी प्रकरणाचा आता पार्ट टू सुरु झालाय.
advertisement
मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या महिला ब्रिगेडने आक्रमक होत संजय राऊतांच्या निवासस्थानी समर्थन आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजीसह राजेश मोरेंच्या धमकीचा महिला ब्रिगेडने निषेध नोंदवला. तर संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी आणि किशोरी पेडणेकरांनी राजेश मोरेंना प्रतिआव्हान दिले.
एकीकडे संजय राऊतांसाठी त्यांचे समर्थक एकवटत असताना ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांविरोधात मोर्चा उघडलेला. एकनाथ भोईरांच्या नेतृत्वात राऊतांचा पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
advertisement
या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या घराबाहेरचा पोलिस बंदोबस्त वाढवला गेलाय. तर संजय राऊतांनी या घडामोडींवरुन एकनाथ शिंदेवर टीकेची संधी सोडली नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी कुणाला घाबरत नाही, अगदी ईडीला सुद्धा... ईडीला न घाबरता मी तुरुंगात गेलो, असे म्हणत राऊत यांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. तसेच माझ्यापर्यंत येऊन तर बघ, पुन्हा परत जातो का... असे म्हणत राऊतांनी राजेश मोरे यांनाही चॅलेंज दिले.
advertisement
एका जाहिरातीतल्या दोन नेत्यांच्या फोटोवरुन सुरु झालेला हा वाद आणि इशारे आणि आता धमक्यांपर्यंत गेलाय. महापालिकेच्या निवडणुकांआधी शिंदे आणि ठाकरे गटात सुरु झालेला हा वाद आता किती टोकापर्यंत जातो हे पहावं लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जाहिरातीचा वाद धमकी आणि इशाऱ्यापर्यंत, राजेश मोरेंच्या धमकीला राऊतांचं प्रत्युत्तर, येऊन तर बघ...