Mahindra चा आता नवा गेम, Thar येतेय नव्या रुपात, 5 डोअर Roxx पेक्षाही असेल भारी!
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्रा आपल्या फेव्हरेट Thar SUV चं 3-door नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आधीच्या Thar पेक्षा ही थार थोडी वेगळी असणार आहे.
Mahindra & Mahindra ने मागील काही वर्षांपासून पॉवरफुल SUV लाँच करून मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला. अलीकडे व्हिजन T चं अंतर्गत कन्स्पेट गाड्यांची झलकही दाखवली. आता महिंद्रा आपल्या फेव्हरेट Thar SUV चं 3-door नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आधीच्या Thar पेक्षा ही थार थोडी वेगळी असणार आहे.
Mahindra कंपनीने Thar Roxx 5-door चे काही अॅडव्हान्स फिचर्स घेतले आहेत आणि ते 3-door Thar मध्ये समावेश करणार आहे. Roxx आणि Thar दोन्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स असले तरी, 5-door व्हेरिएंट आल्यानंतर 3-door Thar च्या विक्रीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, हे फेसलिफ्ट मॉडेल पुन्हा ग्राहकांना आकर्षित करण्यास मदत करेल.
डिझाइनमध्ये का होणार बदल?
फेसलिफ्ट Mahindra Thar 3-door चा एक्सटीरियर पूर्वीपेक्षा अधिक फ्रेश आणि मॉडर्न दिसेल. यात नवीन बम्पर डिझाइन, नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि नवीन अॅलॉय व्हील्स पाहायला मिळणार आहे. हे बदल SUV ला आणखी स्टाईलिश बनवतील.
advertisement
इंटीरियरही बदलणार
नवीन Thar 3-door च्या इंटीरियरमध्ये सर्वात मोठे बदल दिसतील. यात Roxx सारखे नवीन स्टिअरिंग व्हील आणि सेंटर कन्सोल दिले जाऊ शकते. प\वर विंडो स्विच आता दरवाज्यांवर असतील आणि इन्फोटेनमेंट स्क्रीनचा आकारही पूर्वीपेक्षा मोठा असेल. याशिवाय, यात अनेक नवीन कम्फर्ट फीचर्स आणि टेक्नॉलॉजी समाविष्ट केली जाईल. या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये पूर्वीपेक्षा अधिक कंफर्टेबल सीट्स आणि प्रॅक्टिकल फीचर्स मिळतील, जेणेकरून हे वाहन केवळ ऑफ-रोडिंगसाठीच नाही, तर डेली यूजसाठीही अधिक आकर्षक बनेल.
advertisement
इंजिन सुद्धा बदलणार का?
महिंद्रा Thar 3-door फेसलिफ्ट च्या इंजिन लाइनअपमध्ये कोणताही बदल होणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच 1.5-लीटर डिझेल (RWD मॉडेल), 2.0-लीटर पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन असेल. SUV सोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्हीचा पर्याय मिळेल. त्याचबरोबर 4x4 व्हेरिएंट देखील कायम राहतील, जे या गाडीला ऑफ-रोडिंग लव्हर्ससाठी खास बनवतात.
फेसलिफ्ट Thar 3-door ची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. मात्र, कंपनी हे Thar Roxx आणि स्टँडर्ड 3-door Thar यांच्यात बॅलन्स ठेवून सादर करेल. सध्याच्या 3-door Thar ने महिंद्राला विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. नवीन थार कधी लाँच होणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पण, लवकर अधिकृत तारीख जाहीर होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 10:10 PM IST