Maharastra Politics : 'गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहांचे चरण...', दिल्लीत काय खलबतं झाली? संजय राऊंतांनी सांगितली इनसाईड स्टोरी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanjay Raut On Eknath Shinde : एकीकडे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे दिल्लीत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली. त्यानंतर आता मोठी चर्चा सुरू आहे.
Eknath Shinde met amit shah in delhi : सध्या मुंबईत सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन (Maharastra Monsoon session) मध्यातच सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Delhi) अचानक दिल्लीला रवाना झाले अन् महाराष्ट्रात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत मोठा खुलासा केलाय.
काय म्हणाले संजय राऊत?
गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले. जसं धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त धुत आहेत असं दाखवलं. तसंच दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले, असं संजय राऊत म्हणाले.
मराठी एकजूट फोडण्याची तयारी
advertisement
त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. तूर्त इतकंच, बाकीचा तपशील लवकरच, असं संजय राऊत पोस्टमध्ये म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केलंय.
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी…
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025
advertisement
राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना आता दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेट आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आता भाजपसह शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharastra Politics : 'गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहांचे चरण...', दिल्लीत काय खलबतं झाली? संजय राऊंतांनी सांगितली इनसाईड स्टोरी!