'देवेंद्र फडणवीसांची मला चिंता वाटते', संजय राऊत असं का म्हणाले?

Last Updated:

देवेंद्र फडणवीसांच्या व्होट जिहाद विरूद्ध धर्मयुद्धाच्या विधानावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचा सोडा पाक व्याप्त कश्मीर मिळून दाखवा? तिकडे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा

संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत काय म्हणाले?
मुंबई : जनतेला भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ते त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवारालाच मतदान करतील. भाजपाला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे ते मतदारांवर दबाण आणतायत. आणि देवेंद्र फडणवीस हे धर्मयुद्ध असल्याचे म्हणतायत. मात्र हे धर्मयुद्ध कोणत्या धर्माचे असेल तर ते महाराष्ट्र धर्माचे असेल, असा दावा संजय राऊत केला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या व्होट जिहाद विरूद्ध धर्मयुद्धाच्या विधानावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचा सोडा पाक व्याप्त कश्मीर मिळून दाखवा? तिकडे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा. तुम्हाला मत मिळत नाही म्हणून जिहाद का? 2014 मुस्लिम समाजाने मोदींना मतं दिलं होतं मग तोच जिहाद झाला का? भाजपाचे लोक बोखला गये है! ह्यांच्या मानसिक गोंधळाची आम्हाला चिंता वाटते. देवेंद्र फडणीस यांना उपचाराची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
advertisement
राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्र झोपला नाही, महाराष्ट्र जागाच आहे. म्हणून तुम्हाला लोकसभेत महाराष्ट्राने झोपवलं, असा टोला राऊतांनी लगावला. तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही म्हणून आम्ही जागे आहोत.आम्ही झोपलो असतो तर भाजपाने अर्धा सातबारा उद्योगपतींच्या नावावर केला असता, असा चिमटा देखील राऊतांनी काढला.
तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणुक पथकाकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. यानंतर ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे आव्हान केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर बॅगा चेक करायला सुरुवात झाली.निवडणूक आयोग नौटंकी करत आहे. पोलिसांच्या समक्ष पैशांची देवाण-घेवाण सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'देवेंद्र फडणवीसांची मला चिंता वाटते', संजय राऊत असं का म्हणाले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement