संतोष देशमुखांचा मारेकरी सुदर्शन घुलेला गंभीर आजार? सुनावणीदरम्यान अचानक कोसळला

Last Updated:

संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेला आरोपी सूदर्शन घुले चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान, देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना काढण्याची मागणी केली आहे. वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी ही मागणी केली आहे. निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या प्रकरणातून बाजुला करावं, असा अर्ज न्यायालयाला दिला आहे. यावर आज कोर्टात सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीदरम्यान, एक गंभीर प्रकार घडला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेला आरोपी सूदर्शन घुले चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी आरोपी सूदर्शन घुलेचं नाव पुकारलं होतं. नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला. त्यामुळे घुलेला नक्की काय झालं? त्याला कोणता गंभीर आजार झाला आहे का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणीच्या वेळी माननीय न्यायाधीशांनी आरोपीना पुकारले असता सुदर्शन घुले हा उपचार घेत होता, असं सांगितलं. त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर केलं जात होत. यावेळी सुदर्शन घुले अचानक खाली पडला.
तसेच या हत्येवेळी काढण्यात आलेले व्हिडीओज आरोपींच्या वकिलांना द्यावेत, अशी मागणी देखील यावेळी आरोपींच्या वकिलांनी केली. घटनेदरम्यानचे व्हिडिओज आरोपी वकिलांना देण्यात यावे, मग आरोप निश्चिती केली जावी, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. जे व्हिडीओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात आणि वातावरण भावनिक केले जाते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यामुळे सरकारी पक्षाकडून आजच आरोपीच्या वकिलांना व्हिडिओज फाइल दिले जाणार आहेत. दुपारी तीन नंतर पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष देशमुखांचा मारेकरी सुदर्शन घुलेला गंभीर आजार? सुनावणीदरम्यान अचानक कोसळला
Next Article
advertisement
Santosh Deshmukh Beed Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?
संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्
  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

  • संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्

View All
advertisement