आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा आणि आयकार्ड, महायुती सरकारकडून हालचालींना वेग

Last Updated:

या योजनेने सर्पमित्रांना त्यांच्या अपूर्व सेवेसाठी न्याय आणि योग्य मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्प मित्र यांना यामुळे खूप मोठं सहकार्य होणार आहे.

(प्रतिकात्मक फोटो AI)
(प्रतिकात्मक फोटो AI)
मुंबई:  आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करत असतात. बऱ्याच वेळा साप पकडत असताना सापाने दंश केल्यामुळे सर्पमित्रांना आपला जीव गमवावा लागतो. पण आता आता सर्पमित्रांना १० लाखांचा अपघात विमा देण्याची तयारी महायुती सरकारने सुरू केली आहे, तसंच  ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा दिला जाईल, याबद्दल  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली आहे.
ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने, विशेषतः सर्पांच्या धोका टाळण्यासाठी प्रयत्नरत सर्पमित्रांच्या सेवांचा आदर करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु केला जात आहे. लवकरच या कार्यकर्त्यांना अधिकृत ओळखपत्रासोबत १० लाख रुपयांचा अपघात विमा प्रदान केला जाणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांद्वारे सुरुवातीपासूनच प्रस्तावित या उपक्रमात, सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’च्या दर्जाने मान्यता देण्यात येत असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. 'या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे. या शिफारशीमुळे या सेवा कार्यकर्त्यांना अधिकृत आणि मान्यताप्राप्त दर्जा प्राप्त होईल, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची खात्री होईल' असं बावनकुळे म्हणाले.
advertisement
काय आहे नवीन योजना? 
आर्थिक सुरक्षा: अपघाताच्या वेळी १० लाख रुपयांचा विमा रक्कम सर्पमित्रांच्या कुटुंबाला दिला जाईल.
अधिकृत ओळखपत्र: योजनेखाली येणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिकृत ओळखपत्र जारी केले जाईल, ज्यामुळे त्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ या दर्जाचा गौरव प्राप्त होईल.
समाजातील मान्यता: या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सर्पमित्रांच्या सेवेला अधिक प्रशंसा, मान्यता आणि समर्थन प्राप्त होईल.
advertisement
सरकारचा हा उपक्रम वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षा यात संतुलन राखण्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायक पाऊल आहे. या योजनेने सर्पमित्रांना त्यांच्या अपूर्व सेवेसाठी न्याय आणि योग्य मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्प मित्र यांना यामुळे खूप मोठं सहकार्य होणार आहे. कारण, अनेकदा सर्प मित्र तेव्हा जंगलात किंवा रेस्क्यू ॲापरेशन करताना त्यांच्या अद्यावत असे किट पाहायला मिळत नाही. त्यामुळे अनेकदा सर्प मित्र मोठ्या प्रमाणात आपल्याला गंभीर जखमी होताना पाहायला मिळत असतात त्याच प्रमाणे काही सर्पदंश झाल्यामुळे दगावतात देखील. यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा आणि आयकार्ड, महायुती सरकारकडून हालचालींना वेग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement