... तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य, PSI बदनेबद्दल म्हणाल्या....

Last Updated:

फलटणच्या दुर्दैवी घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूसकर यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करीत आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे सांगितले.

वैशाली कडुसकर (सातारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक)
वैशाली कडुसकर (सातारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक)
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. तिने तिच्या तळहातावर एक चिठ्ठी लिहून पोलिस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बदने यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. तसेच पोलीस अधिकारी बनकर यांनी तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला होता, असा आरोप पीडित डॉक्टरने केला आहे. या दुर्दैवी घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूसकर यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करीत आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक बदने याने पीडित डॉक्टरवर अत्याचार केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातावरील लिहिलेल्या संदेशाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी फलटणमधून अटक केली आहे. गोपाळ बदने अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. या सगळ्यावर साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूसकर यांनी त्यांचे मत मांडले आहे.
advertisement

... तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता

जर त्या महिला डॉक्टरच्या तक्रारीवर वेळीच कारवाई झाली असती किंवा तिने स्वतः तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल कोणाला सांगितले असते तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता. एक महिला पोलिस अधिकारी म्हणून, मला या घटनेबद्दल खूप वाईट आणि वेदनादायक वाटले, असे वैशाली कडूसकर म्हणाल्या.
advertisement
आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन संवादाची कमी आहे का? असे विचारले असता, असे म्हणता येणार नाही. आरोपी पोलीस आहे म्हणून चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण समाजात अनेक प्रवृत्ती वावरत असतात. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा संवाद चांगला असतो. आरोपीला न्याय प्रक्रियेमध्ये घेऊन जाणे हे पोलिसांचे काम आहे. पीडितांना न्याय मिळवून देणे, हे पोलीस आणि डॉक्टरांचे कामच आहे. दोघेही एकमेकांच्या सहयोगाने काम करीत असतात, असे वैशाली कडूसकर म्हणाल्या.
advertisement
advertisement

पीडित पोलिसांना सांगू शकत नसतील तर तुम्ही पोलिसांना कळवा

पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करायला पाहिजे. आपण लोकांच्या सुरक्षितेसाठी काम करतो. आपल्यावर जबाबदारी अधिक असते, हे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक प्रसंग येतात पण वाईट प्रसंगांपासून सावध राहिले पाहिजे. समाजात अशा गोष्टी निदर्शनास येत असतील आणि पीडित पोलिसांना सांगू शकत नसतील तर तुम्ही त्या पोलिसांना कळवा, असे आवाहन त्यांनी केले.
advertisement

आमची लेक आत्महत्या करण्यासारखी नव्हती

सुसाईड नोटमध्ये असलेल्या सर्व आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. आम्ही फलटणमध्ये पोहोचण्याअगोदरच मृतदेह खाली घेतला होता.
आमची मुलगी आत्महत्या करण्यासारखी मुलगी नव्हती, असे कुटुंबियांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
... तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य, PSI बदनेबद्दल म्हणाल्या....
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement