महिला डॉक्टरच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर

Last Updated:

Satara Dr Sampada Munde Case : महिला डॉक्टरने लिहिलेले आणखी एक पत्र समोर आले आहे. या पत्रात खासदार आणि त्यांच्या स्वीय सचिवाचा उल्लेख आहे.

डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर
डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर आता खळबळजनक खुलासे समोर येऊ लागले आहेत. महिला डॉक्टरने त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरने लिहिलेले आणखी एक पत्र समोर आले आहे. या पत्रात खासदार आणि त्यांच्या स्वीय सचिवाचा उल्लेख आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणाने साताऱ्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आयुष्य संपवलं. महिला डॉक्टरने काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. याच चौकशी समितीला सादर करण्यात आलेले एक पत्र समोर आलं आहे.
advertisement

चौकशी समितीला दिलेल्या पत्रात काय?

महिला डॉक्टर यांच्यावर पोलिसांचा, वैद्यकीय क्षेत्रातील काहींचा दबाव होता. वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांकडून काही संशयित आरोपींना आणण्यात येत असे. त्यावेळी महिला डॉक्टरवर पोलिसांकडून संशयित आरोपी फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात येत असे. मात्र, महिला डॉक्टरने या प्रकाराला नकार देत वस्तुस्थितीनिहाय अहवाल देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला डॉक्टर यांचा छळ सुरू झाला.
advertisement
महिला डॉक्टरने आपल्या पत्रात संशयित आरोपीना फिट चे प्रमाणपत्र देण्यासाठी पोलिसांकडून दबाव असल्याचा आरोप केला. त्याला नकार दिल्यानंतर पोलिसांनी टॉर्चर करायला सुरुवात केली असल्याचे म्हटले. त्याशिवाय, डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही पोलिसांवर कारवाई झाली नाही.

पोलिसांसाठी डॉक्टर संपदाला खासदाराचा फोन

महिला डॉक्टरचा मानसिक छळ सुरू करण्यात आला होता. बीडचे मुंडे कसे आहेत, कसे गुन्हे करतात असे म्हणत सतत हिणवले जात होते.
advertisement
चौकशी समितीला सविस्तर सांगूनही दाखल घेतली नाही. पोलीस निरीक्षक अनिल महाडीक यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. त्याशिवाय, एकदा खासदारांनी फोन केला असल्याचे पत्रात म्हटले आहे. खासदारांच्या पीएने वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी थेट खासदारांना फोन लावून दिला होता. त्यांनी देखील तुम्ही बीडचे असल्याने प्रमाणपत्र देत नाहीत, अशी पोलिसांची तक्रार असल्याचे म्हटले. त्यानंतर महिला डॉक्टरने असे पुन्हा होणार नसल्याचे सांगितले.
advertisement
जूनमध्ये केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने 13 ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा माहिती अधिकार टाकून डीवायएसपी कार्यालयाकडून ऑफिसकडून माहिती मागवली. मात्र, तपासात कोणतेही सहकार्य होत नसल्याने आणि शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याने महिला डॉक्टरने अखेर टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिला डॉक्टरच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement