मासेमारीवेळी जाळे टाकताना तोल गेला, टीमचं दिवसभर शोधकार्य सुरू होतं पण....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Shivsagar Tapola: शिवसागर जलाशयात मारेमारी करत असताना जाळे टाकतावेळी तोल गेल्याने एक जण बुडून बेपत्ता झाला आहे.
सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये तापोळ्याच्या आपटी गावातील किसन धोंडीबा कदम (वय ४३) हे बोटीतून मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना पाण्यात बुडून बेपत्ता झाले. रेस्क्यू टीमने अनेक तासांची शोधमोहीम राबवल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
तापोळ्याच्या आपटीमधील किसन धोंडीबा कदम हे शिवसागर जलाशयात शुक्रवारी रात्री साधारण सात ते आठ वाजताच्या सुमारास बोटीतून मच्छीमारीसाठी निघाले. जाळे टाकत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. काहीच वेळात ही बातमी गावात पसरली.
घटनेबाबत माहिती गावचे पोलिस पाटील शामराव गायकवाड यांनी पोलिसांना अवगत केले. त्यानंतर आज सकाळपासून स्थानिक नागरिकांनी शोधकार्य सुरू केले होते. तापोळा खोऱ्यातील अनेक नागरिक शोधकार्यात सहभागी झाले होते. अनेकांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बेपत्ता कदम मिळून आले नाहीत.
advertisement
सकाळी अकराच्या सुमारास महाबळेश्वर, सह्याद्री आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या टीमनेही कदम यांचा शोध घेतला मात्र त्यांच्या शोधकार्यालाही यश आले नाही. सायंकाळी उशिरा हे शोधकार्य रेस्क्यू टीमने थांबवले.
तापोळा खोऱ्याला कोयनेच्या शिवसागर जलाशयाने वेढा दिला आहे. इथला मुख्यत्वे भर भातशेती आणि पर्यटनावर असतो. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण मासेमारी करतात. मासेमारी करत असतानाच शुक्रवारी रात्री कदम पाण्यात बुडाले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
January 04, 2025 7:20 PM IST