Satara News : महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? त्याआधी ही महत्त्वाची बातमी वाचा, नाही तर पावसात होतील हाल!

Last Updated:

Satara News : पावसात सहलीसाठी महाबळेश्वर घाटमाथ्यावर जाण्याचे प्लॅन अनेकजण करतात. महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? त्याआधी ही महत्त्वाची बातमी वाचा, नाही तर पावसात होतील हाल!
महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? त्याआधी ही महत्त्वाची बातमी वाचा, नाही तर पावसात होतील हाल!
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा: पावसात सहलीसाठी महाबळेश्वर घाटमाथ्यावर जाण्याचे प्लॅन अनेकजण करतात. महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता दरड कोसळल्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. विशेषतः आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत ही दरड कोसळली असून, त्यामुळे या मार्गावर मोठं खडबडीत आव्हान निर्माण झालं आहे.

पर्यटक आणि वाहनचालकांसाठी प्रशासनाचा इशारा

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळलेली जागा अत्यंत धोकादायक असून, त्या भागात अजूनही माती आणि खडक खाली सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुढील पाच दिवसांसाठी आंबेनळी घाटातील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना या दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे हा निर्णय तात्पुरता असला तरी आवश्यक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
advertisement

पर्यटनावर होणार तात्पुरता परिणाम

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर परिसरात पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र, या घटनेमुळे काही प्रमाणात पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक यंत्रणांनी दरड हटवण्याचे काम सुरू केलं असून, हवामान सुधारल्यास काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पावसाळी हवामानामुळे घाटमाथ्यांवर दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News : महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? त्याआधी ही महत्त्वाची बातमी वाचा, नाही तर पावसात होतील हाल!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement