सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; मृत निंबाळकरची पत्नी-बहीण समोर, रिपोर्ट बदलल्याचा आणखी एक पुरावा

Last Updated:

रत्नशिव निंबाळकर या तरुणाच्या कुटुंबाने अंधारेंची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केलीय.

News18
News18
सातारा : फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी आक्रमक भूमिका घेतलीय आहे. आता अंधारेंनी आणखी एक दावा केला आहे. रत्नशिव निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025 ला हत्या झाली होती. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता.. दरम्यान महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता, याचा पुरावा सुषमा अंधारेंनी समोर आणलाय. रत्नशिव निंबाळकर या तरुणाच्या कुटुंबाने अंधारेंची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केलीय.
डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव येत होते. त्याचा आणखी एक पुरावा सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाचा 12 मार्च 2025 ला निर्घृण खून झाला. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता. डॉ. संपदा मुंडे ने असे करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
advertisement

काय म्हणाली पत्नी?

सात महिने झाले तरी अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. न्यायसाठी आम्ही खूप फिरलो पण आमची दखल कोणी घेतली नाही. पोस्टमार्टममध्ये आम्हाला अपघात सांगितलं, अशी माहिती मृत रत्नशिव निंबाळकर यांच्या पत्नीने दिली. तर रत्नशिव निंबाळकर यांची बहीण शीतल शिंदे यांनी देखील भावाला न्याय द्यावा अशी मागणी केली. दत्तात्रय ऊर्फ काका यानं अपघाताचा बहाणा घडवून आणत भावाच्या डोक्यात कोयत्यानं वार केल्याचं म्हटलं. आठ दिवसानंतर एफआयर दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं.राजकारणातून दबाव येतोय असं आमच्या लक्षात येतेय, असं शीतल शिंदे म्हणाल्या.
advertisement
advertisement
आरोपी कोण आहे?
रत्नशिव निंबाळकर पत्नी, मुलांसह ,आई वडील अन् विधवा बहीण आणि तिच्या मुलांचा सांभाळ करत होता.फक्त गावात नाव बदनाम केल्याच्या रागातून दत्तात्रय निंबाळकर यानं रत्नशिव निंबाळकराला गाडीनं ठोकून आणि त्यानंतर कोयत्यानं वार करुन संपवलं. रत्नशिव निंबाळकर बहिणीच्या मुलाला परीक्षेसाठी सोडायला निघाले होते. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही .  मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा भाऊ सुरेश निंबाळकर भाजपचा फलटणचा सरचिटणीस आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; मृत निंबाळकरची पत्नी-बहीण समोर, रिपोर्ट बदलल्याचा आणखी एक पुरावा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement