'एक पेड मां के नाम' या अनोख्या उपक्रमात 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग, 12 लाखांपेक्षा जास्त बियांचं केलं रोपण, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा वन्यजीव सामाजिक वनीकरण विभाग आणि उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वन महोत्सव 2024- 25 अंतर्गत 'एक पेड मा के नाम' हा उपक्रम किल्ले चंदन वंदन गडावर उपक्रम राबवला.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदन वंदन गडावर गोळा केलेल्या 12 लाख 78 हजारांच्या विविध प्रजातांच्या बियांचे गडावर रोपण केले. 'एक पेड मां के नाम' या उपक्रमांतर्गत हे रोपण करण्यात आले. हा उपक्रम नेमका काय आहे, याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
सातारा वन्यजीव सामाजिक वनीकरण विभाग आणि उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वन महोत्सव 2024- 25 अंतर्गत 'एक पेड मा के नाम' हा उपक्रम किल्ले चंदन वंदन गडावर उपक्रम राबवला. या कार्यक्रमात उडतारे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या 12 लाख 78 हजाराच्या विविध प्रजातीच्या बियांचे रोपण करण्यात आले. यावेळी या उपक्रमात 1 हजार 200 सीडबॉल तयार करून याची लागवड देखील करण्यात आली. वड, पिंपळ अशा विविध प्रजातींचे 105 वृक्ष लावण्यात आले. उडतरे येथील शाळेतील 1200 विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला.
advertisement
Kolhapur-Pune-Kolhapur, वंदे भारतने करता येणार प्रवास, सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते दाखवला जाणार हिरवा झेंडा
विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात स्काऊट गाईड आणि हरित सेना अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्यामुळे विद्यालयातील मुलांच्या मनात झाडे लावण्याची संकल्पना रुजवली. त्यामुळे 1 लाख 25 हजार बियांचे संकलन करून चंदन वंदन या किल्ल्यावर यांचे रोपण करण्यात आले. गेल्या 3 वर्षांपासून या शाळेमध्ये बीज संकलन हा उपक्रम राबवला जात आहे. शाळेमध्ये 1500 सीड बॉल मुलांनी तयार केले आहेत. एक पेड मां के नाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या उपक्रमामध्ये सातारच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
advertisement
नमो शेतकरी महासन्मान योजना : सोलापुरात इतक्या शेतकऱ्यांनी घेतला लाभ, VIDEO
साताऱ्यातील अनेक किल्ल्यांवर हा उपक्रम राबवणार असल्याचे देखील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर आणि मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम उपस्थित होते. या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 14, 2024 5:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
'एक पेड मां के नाम' या अनोख्या उपक्रमात 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग, 12 लाखांपेक्षा जास्त बियांचं केलं रोपण, VIDEO