मोठी बातमी! विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला; अजितदादांनी फोनवरच केली घोषणा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
महायुतीचा पहिला उमेदवार ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरच राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
सातारा, सचिन जाधव, प्रतिनिधी : लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यात यावेळी महाविकास आघाडी विरोधात महायुती असाच सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. मात्र सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे, लवकरच उमेदवारांच्या नावाची यादी देखील जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा पहिला उमेदवार ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरच राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाही, मात्र त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधला, यावेळी त्यांनी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
advertisement
दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान अजित पवार यांनी थेट फोनद्वारे दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
view commentsLocation :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
September 30, 2024 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
मोठी बातमी! विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला; अजितदादांनी फोनवरच केली घोषणा


