सातारा जिल्ह्यात पाऊस जोरदार! दोन महिन्यांतच 49% पाऊस, प्रमुख धरणे 86 टक्के भरली
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सातारा जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे ८६% भरली आहेत. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या सहा...
सातारा : जिल्ह्यात या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आतापर्यंतच्या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या तब्बल 49 पाऊस झाला असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरू लागली आहेत. सध्या जिल्ह्यातील सहा मोठ्या प्रकल्पांमध्ये 128 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, जो एकूण क्षमतेच्या 86 टक्के आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक असल्याने, या वर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जून आणि जुलैमध्ये दमदार पाऊस
जिल्ह्यात मान्सून जूनच्या सुरुवातीला दाखल होतो आणि सप्टेंबरपर्यंत पाऊस पडतो. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 886 मिलिमीटर आहे. या तुलनेत यावर्षी केवळ दोन महिन्यांतच 435 मिलिमीटर (49 टक्के) पाऊस झाला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील मोठी धरणे वेगाने भरत आहेत.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा
कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या सहा मोठ्या धरणांची एकूण साठवण क्षमता 148.74 टीएमसी आहे. सध्या त्यात 128 टीएमसी पाणीसाठा असून, ही धरणे सुमारे 86 टक्के भरली आहेत. यामध्ये धोम 93%, बलकवडी 90% तर कोयना धरण सुमारे 84% भरले आहे. जिल्ह्यातील 10 मध्यम प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता 8.74 टीएमसी असून, सध्या त्यात 7 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे प्रकल्प सुमारे 81 टक्के भरले आहेत.
advertisement
खरीप पेरण्यांनाही वेग
सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर झाल्या आहेत. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर (85 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर) पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत. या वर्षीची पाण्याची स्थिती पाहता सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
advertisement
हे ही वाचा : रक्षाबंधन स्पेशल : मुंबई-कोल्हापूर दरम्यान सांगलीमार्गे विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
सातारा जिल्ह्यात पाऊस जोरदार! दोन महिन्यांतच 49% पाऊस, प्रमुख धरणे 86 टक्के भरली