कराडमध्ये आश्रमात लैंगिक शोषण, राजकारणी अन् पोलीसही सामील; अभिनेत्याच्या दाव्यानं खळबळ

Last Updated:

बदलापूर प्रकरणाने वातावरण तापलं असताना आता किरण माने यांनी केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.

News18
News18
मुंबई : कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानतंर बदलापूर अत्याचाराने संतापाची लाट उसळलीय. शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवर अत्याच्याराचा इतर घटनाही राज्यात घडल्या. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेते किरण माने यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत धक्कादायक असा दावा केलाय. किरण माने यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. बदलापूर प्रकरणाने वातावरण तापलं असताना आता या दाव्याची चर्चा होत आहे.
कराडजवळ असलेल्या एका आश्रमात सेक्स स्कँडल सुरू असल्याचा दावा किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. यात समाजसेविका, राजकारणी आणि इतंकच नाही तर पोलीस सुद्धा सामील असल्याचं किरण माने यांनी म्हटलंय. निराधार मुलींसाठी असलेल्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा हा प्रकार भयानक असल्याचं किरण माने म्हणाले.
किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, कराडजवळील टेंभू गांवातल्या 'छत्रछाया' या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती.
advertisement
अनेक बडे पोलीस अधिकारी या सेक्स स्कँडलमध्ये असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी 'चीप' मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे 'लापता' आहेत असंही किरण माने म्हणाले आहेत.
बदलापूर प्रकरणावरून किरण माने यांनी सरकारवर टीकाही केली होती. जनतेचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐका. क्रूर आणि कोडग्या सत्ताधाऱ्यांनो.. जेव्हा एका लहान लेकरावर बलात्कार होतो ना, तेव्हा ती जखम आणि ती वेदना प्रत्येक स्त्रीला होते. महाराष्ट्रातल्या घरातली एकेक लाडकी बहीण आज बदलापूरमधल्या वेदनेनं कळवळतेय असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
कराडमध्ये आश्रमात लैंगिक शोषण, राजकारणी अन् पोलीसही सामील; अभिनेत्याच्या दाव्यानं खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement