Satara : प्रियकराने इमारतीवरून ढकलले, प्रेयसीचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने खळबळ
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कराडमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियकराने इमारतीवरून ढकलल्याची घटना घडलीय.
सातारा : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड चर्चेत असताना राज्यात इतर ठिकाणीही प्रेम प्रकरणातून हल्ला आणि खूनाच्या घटना समोर येत आहेत. आता कराडमध्ये प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कराडमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियकराने इमारतीवरून ढकलल्याची घटना घडलीय. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. २१ वर्षीय तरुणीचं नाव आरुषी सिंग असं आहे. ती मलकापूरमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरुषी सिंग ही कराडमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिचा इमारतीवरून तिला प्रियकराने ढकलून दिल्याने मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याबाबत काही माहिती समोर आली नव्हती. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादानंतर प्रियकराने तिला इमारतीवरून ढकलले. यातच तिचा मृत्यू झाला. कराड शहर पोलिस ठाण्यात प्रियकर ध्रृव छिक्कारावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
आरुषी आणि धृव हे दोघेही बाहेरच्या राज्यातले असून आता पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. आरुषीच्या मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं आहे. कराड शहर पोलिसांनी याबाबत अद्याप अधिक माहिती दिलेली नाही.
आधी दारु पाजली, मग आणखी एकाला बोलावलं... लहानपणीच्या मित्राकडून सॉफ्टवेयर इंजीनिअरवर बलात्कार
तेलंगणातील हैदराबाद शहरात पुन्हा एकदा बलात्कारासारखी घृणास्पद घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसोबत दोघांनी बलात्कार केला आहे. त्यांपैकी एक हा या तरुणीचा लहानपणीचा मित्र होता. सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
advertisement
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, शहरातील लेक्चरर्स कॉलनी, हयात नगर येथील रहिवासी गौतम रेड्डी आणि अन्य एका व्यक्तीने सॉफ्टवेअर अभियंत्याला क्रूरपणे मारहाण केली. वनस्थलीपुरमचे एसीपी कासी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या बालपणीचा मित्र गौतम रेड्डीसोबत एका पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेली होती तेव्हा ही घटना घडली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2024 10:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara : प्रियकराने इमारतीवरून ढकलले, प्रेयसीचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने खळबळ


