पवारांचे धक्क्यावर धक्के! काल भाजप, आज नंबर अजितदादांचा; रामराजे तुतारी फुंकणार
- Published by:Suraj
Last Updated:
हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात अजित दादांना रामराजेंच्या निर्णयाने धक्का बसण्याची शक्यता आहे.
सातारा : फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे निंबाळकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज १८ लोकमतला दिलीय. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय. आता हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात अजित दादांना रामराजेंच्या निर्णयाने धक्का बसण्याची शक्यता आहे.
रामराजे यांनी महिन्याभरापूर्वी फलटणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी तुतारीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. रामराजे म्हणाले होते की, फलटणमध्ये रणजीत निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांची दहशत रोखली पाहिजे असं म्हटलं होतं. माझं भाजपशी काही भांडण नाही. पण एकच तक्रार आहे इथं जी दहशत निर्माण झालीय, जो प्रकार सुरूय त्याविरोधात तक्रार केली आणि वरिष्ठांनी त्यावर कारवाई करावी इतकीच मागणी आहे.
advertisement
वरिष्ठांशी चर्चा करून आपण वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवू. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही. आपल्या तक्रारीने फरक पडला नाही तर तुतारी वाजवायला किती वेळ लागतो असंही ते फलटणमधील कार्यक्रमात म्हणाले होते. महाविकास आघाडीत फलटण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रामराजे निंबाळकरांची साथ मिळाल्यास शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पवारांचे धक्क्यावर धक्के! काल भाजप, आज नंबर अजितदादांचा; रामराजे तुतारी फुंकणार


