Satara : शरद पवारांना मोठा धक्का; साताऱ्यात करेक्ट कार्यक्रम, बडा नेता भाजपमध्ये
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
सातारा : साताऱ्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का दिला. भाजपने शरद पवारांच्या नेत्याला पक्षात घेतलंय. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या नेत्यानं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय़ घेतला. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत होते. फलटण तालुक्याच्या राजकारणात माणिकराव सोनवलकर यांचा दबदबा आहे. त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत मजल मारलीय. आता सोनवलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राजे गटाला खिंडार पडलं.
राजे गटातून माणिकराव सोनवलकर यांनी खासदार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. माणिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्चेकर हेसुद्धा उपस्थित होते. याचीही चर्चा साताऱ्यात होत आहे.
advertisement
माणिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माणिकराव सोवलकर साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भाजपमध्ये आलेत. जिल्हा परिषदेचे ते नेते असून ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये सहभागी झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2024 2:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara : शरद पवारांना मोठा धक्का; साताऱ्यात करेक्ट कार्यक्रम, बडा नेता भाजपमध्ये


