Satara News : साताऱ्यात स्कॉर्पिओ 300 फूट खोल दरीत कोसळली; गाडीत 7 प्रवासी; घटनास्थळावरुन पहिला VIDEO समोर

Last Updated:

Satara News : कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.

News18
News18
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सगळीकडे हिरवळ पसरली आहे. नदी, नाले धबधबे ओसांडून वाहत आहेत. अशात फिरायला जाणे कोणाला आवडणार नाही. मात्र, पर्यटन करताना काळजी देखील घ्यायला हवी. नाहीतर जीवावर बेतण्याची शक्यता आहे. अशीच एक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेश खिंडीत स्कॉर्पिओ गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दरीत गेली असल्याची माहिती मिळत आहे. या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. यामधील 2 जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव या ठिकाणचे हे सर्वजण असल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी उशिरा कास पठाराहून साताऱ्याकडे येत असताना ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी तालुका पोलीस आणि छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम दाखल झाली आहे. ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/सातारा/
Satara News : साताऱ्यात स्कॉर्पिओ 300 फूट खोल दरीत कोसळली; गाडीत 7 प्रवासी; घटनास्थळावरुन पहिला VIDEO समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement