भावडांनी सांभाळला वडिलांचा व्यवसाय, दिवसाला 2 हजाराची कमाई, साताऱ्यातील फेमस दीक्षित डोसाचा दरही कमी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
व्यवसाय करण्यासाठी वयाची अट नसते तिथे कष्टाची जोड असली की व्यवसाय आपोआप प्रसिद्धीस येतो असंच एक साताऱ्यातील राजवाडा चौपाटी येथे गेले अनेक वर्षापासून बहिण भावंड एकत्र येऊन डोसा तयार करत आहेत वडिलांनंतर शालेय शिक्षण घेत या भावंडांनी एकत्र येऊन राजवाडा चौपाटी येथे दीक्षित डोसा हा साताऱ्या फेमस डोसा केला आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : व्यवसाय करण्यासाठी वयाची अट नसते. जिथे कष्टाची जोड असली की व्यवसाय आपोआप प्रसिद्धीस येतो. साताऱ्यात एका ठिकाणी ही विचार तंतोतंत लागू पडतो. साताऱ्यातील राजवाडा चौपाटी येथे गेले अनेक वर्षापासून भावंडे एकत्र येऊन डोसा विक्री करतात. शालेय शिक्षण घेत या भावंडांनी एकत्र येऊन राजवाडा चौपाटी येथे दीक्षित डोसा हा साताऱ्या फेमस डोसा केला आहे. आज जाणून घेऊया साताऱ्यातील फेमस दीक्षित डोसाची संपूर्ण कहाणी.
advertisement
तेजस राजेश दीक्षित आणि त्यांचे लहान भाऊ हे एकत्र येऊन राजवाडा चौपाटी येथे मागील 10 वर्षांपासून डोसा विक्री करत आहेत. वडिलांनंतर या तिन्ही भावंडांनी आपली घरची परिस्थिती सुधारण्यासाठी शालेय शिक्षण घेत वडिलांचा डोसा तयार करण्याचा जो व्यवसाय होता तो पुढे नेण्याचा निर्णय घेतला. यावरच त्यांनी आपले आणि आपल्या भावांचे आणि बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. शाळा सुटल्यावर ते आपल्या डोसाच्या गाडीवर येऊन डोसा शिकायचे आणि घरी गेल्यावर अभ्यास करायचे. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. तेजस दीक्षित हे घरातील मोठा मुलगा म्हणजेच कर्ता पुरुष झाला आणि त्याने घराची सर्व जबाबदारी घेतली.
advertisement
त्याचबरोबर आपल्या भावाच्या आणि बहिणीचे शिक्षणाचे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपला बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केलं आणि त्यानंतर आपल्या भावंडांच्या मदतीने राजवाडा चौपाटी येथे दीक्षित डोसा हा राजवाडा चौपाटी येथील फेमस डोसा तयार केला. एकदम अल्प दरात मोठा डोसा कुठे मिळणार तर तो फक्त दीक्षित डोसेवाल्यांकडेच, अशी त्यांची ख्याती झाली.
advertisement
खवय्यांच्या मनात त्यांनी आपल्या डोसाच्या चवीने आणि साईजमुळे घर केले. हळूहळू या डोसाची चव आणि डोसाची ख्याती संपूर्ण सातारा शहरात त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात पसरली. यामध्ये आपल्या बहिणीचा हातभार आणि भावाचा असल्याचा देखील तेजस दीक्षित यांनी सांगितले.
advertisement
भावाला मदत करण्यासाठी लहान बंधूही शिक्षण घेत आपल्या मोठ्या भावाला व्यवसायामध्ये मदत करत होता. साताऱ्यातील राजवाडा चौपाटी येथे दीक्षित डोसा 30 रुपयापासून दिला जातो. त्याचबरोबर मसाला डोसा, कट डोसा, स्पम डोसा असे वेगवेगळ्या डोसाच्या डिशेस ते अगदी अल्प दरामध्ये विकतात. याठिकाणी 30 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत या डोसाची विक्री ते करतात. याठिकाणी दिवसाला दोन हजार रुपयांचे डोसे विकले जातात.
advertisement
MPSC मध्ये 9 वेळा फेल; पण फक्त दीड वर्षात फेडलं बापाचं लाखो रुपयांचं कर्ज, पोहे विकणाऱ्या तरुणाची प्रेरणादायी गोष्ट!
view commentsया माध्यमातून ते महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहेत. तसेच या माध्यमातून आपली उपजीविका भागवत आहेत. अगदी गरीब कुटुंबातील या बहिण भावंडांनी आपल्या घराचा आणि आपल्या शिक्षणाचा बोझा आपल्या खांद्यावर घेऊन व्यवसाय चालू केला. अगदी 14 ते 15 वयाचे असल्यापासून या भावंडांनी वडिलांनी सुरू केलेला डोसाचा व्यवसाय पुढे घेऊन गेले आहेत. त्यांचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 26, 2024 6:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
भावडांनी सांभाळला वडिलांचा व्यवसाय, दिवसाला 2 हजाराची कमाई, साताऱ्यातील फेमस दीक्षित डोसाचा दरही कमी!

