84 होवो नाहीतर 90 वर्षे, हे म्हातारं स्वस्थ बसणार नाही, शरद पवार यांचं तडफदार भाषण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Phaltan Politics: लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत असूनही रामराजे निंबाळकर यांच्या दोन्ही बंधूंनी भाजप उमेदवाराला विरोध करण्याचा निर्णय घेऊन माढ्यात तुतारी वाजवली.
फलटण : "मी चौदा वेळा निवडणूक लढलो. सातवेळा दिल्ली, सातवेळा महाराष्ट्राची.... तुम्ही मला थांबवलंच नाही... अहो शाळकऱ्यांनाही सुट्टी देतात पण तुम्ही १४ निवडणुकीत मला सुट्टीच दिली नाही. तुम्ही सांगितलं ते काम करत राहिलो. माझं वय 84 होवो नाहीतर 90 वर्षे, हे म्हातारं स्वस्थ बसणार नाही", असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फलटणची सभा गाजवली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत असूनही रामराजे निंबाळकर यांच्या दोन्ही बंधूंनी महायुतीत असूनही भाजप उमेदवाराला विरोध करण्याचा निर्णय घेऊन माढ्यात तुतारी वाजवली. तेव्हापासून नाईक निंबाळकर बंधू आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा वारंवार रंगत होत्या. मध्यंतरी अजित पवार यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अजित पवार यात अयशस्वी ठरले. अखेर अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी जोरदार भाषण ठोकून फलटणची सभा गाजवली.
advertisement
शरद पवार म्हणाले म्हणाले, माझ्यासमोर काही तरुण हातात फलक घेऊन उभे आहेत. माझा फोटो त्यावर आहे आणि त्यावर लिहिलंय- 84 वर्षांचा म्हातारा... अरे मला अजून लय लांब जायचंय. 84 होवो नाहीतर 90 वर्षे होवो... हे म्हातारं काय थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. त्याची काळजी करू नका.. यासाठी तुमची मदत मला अंत:करणापासून होईल, अशी खात्री बाळगतो, असे पवार म्हणाले.
advertisement
आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचाय. मी महाविद्यालयात शिकत असताना महाराष्ट्र निर्माणामध्ये फलटणचा सहभाग होता. त्या चळवळीत हरिभाऊ निंबाळकर नावाचे कार्यकर्ते आमदार झाले. कारण लोकांना मराठी भाषिकांचं राज्य हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव मनमोहन पॅलेस फलटणमध्ये झाला. मालोजीराव राजेसाहेबांनी तो ठराव मांडला. संजीवराजे, रघुनाथराजे आज आपल्यात रामराजे दिसत नाहीत, पण चिंता करू नका. त्यांची मानसिकता काय हे मला धैर्यशील मोहिते पाटलांनी कळवली आहे. फलटणच्या लोकांनी त्यांना विचारलं, काय करू... तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा...लोकांनी करायचं ते केलं.. अशी मिश्किल फटकेबाजीही पवार यांनी केली. सरशेवटी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून दिलं यासाठी पवारांनी जनतेचे आभार मानले.
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 14, 2024 7:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
84 होवो नाहीतर 90 वर्षे, हे म्हातारं स्वस्थ बसणार नाही, शरद पवार यांचं तडफदार भाषण


