Karad News: कोयना नदीत मगर दिसल्याने खळबळ, 'या' ड्रोन व्हिडिओमुळे मगरींचा धोका स्पष्ट!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर मगरींचा वावर असल्याची केवळ चर्चा राहिलेली नसून, तो आता एक गंभीर धोका बनला आहे. कराडमधील व्यावसायिक...
कराड : कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर मगरींचा वावर असल्याची केवळ चर्चा राहिलेली नसून, तो आता एक गंभीर धोका बनला आहे. कराडमधील व्यावसायिक छायाचित्रकार सुरेश पवार यांनी सोमवारी सकाळी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोयना नदीत मुक्तपणे संचार करणाऱ्या एका मगरीचा थरारक व्हिडीओ चित्रित केला आहे. याआधी केवळ दुरून दिसणारी आणि मोबाईलमध्ये अस्पष्टपणे कैद होणारी मगर प्रथमच इतक्या जवळून आणि स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये आणि विशेषतः पोहायला जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ड्रोन कॅमेऱ्यात मगर स्पष्ट दिसली!
सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास छायाचित्रकार सुरेश पवार हे प्रीतिसंगमाचे विहंगम दृश्य आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपत होते. त्याचवेळी शहराच्या शुक्रवार पेठेच्या विरुद्ध दिशेला, गोटे गावच्या हद्दीलगत नदीपात्रात एक मोठी मगर पहुडलेल्या अवस्थेत स्पष्टपणे दिसली. या घटनेमुळे केवळ कृष्णानदीतच नाही, तर कोयना नदीतही मगरींचे वास्तव्य आहे, हे स्पष्ट झाले आहे.
advertisement
आधीही घडल्या होत्या घटना, आता नागरिकांनी सावध राहावे
मागील दोन-तीन वर्षांपासून कराडसह गोटे, खोडशी, सैदापूर गावांच्या परिसरात मगरींचा वावर असल्याचे दिसून आले होते. सध्याचा ड्रोन व्हिडीओ त्याचा एक ठोस पुरावा ठरलेला आहे. काही वर्षांपूर्वी पोहायला गेलेल्या एका नागरिकावर मगरीने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. त्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला असला तरी ते जखमी झाले होते. हा धोका असतानाही अनेक नागरिक बिनधास्तपणे संगमावर पोहायला येतात. या ताज्या घटनेने सर्वांसाठी एक मोठा धोका निर्माण झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नदीत उतरताना किंवा नदीकिनारी वावरताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
https://youtube.com/shorts/Zm5IvAJGs5Q?si=haoZwQf4Ddd_sSvf
यापूर्वीही विद्यानगर (सैदापूर) येथील कृष्णा कॅनाॅल आणि खोडशी येथे मगर पकडण्यात यश आले होते. त्यावेळी कृष्णा नदी आणि कॅनाॅलमध्ये खूप अंतर असूनही मगर आढळली होती, ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ती मगर पकडून सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आली होती. या घटनांनंतर आता कराड शहरालगत नदीकिनारी पुन्हा मगर दिसल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
हे ही वाचा : Kolhapur News: कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'या' 6 जिल्ह्यांचा समावेश; उद्घाटन समारंभाची तारीख बदलली!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Karad News: कोयना नदीत मगर दिसल्याने खळबळ, 'या' ड्रोन व्हिडिओमुळे मगरींचा धोका स्पष्ट!