रंगबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरले साताऱ्यातील कास पठार, मोहित करणारं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सध्या पठारावर फुलांची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अधून मधून येणारा पाऊस, दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून त्याचबरोबर देशभरातून आणि विदेशातून पर्यटक कास पठाराकडे येऊ लागले आहेत.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर खरी दुर्मिळ, रंगबिरंगी फुलांची रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. ही अद्भुत डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही कास पठारावर नैसर्गिक रंगबिरंगी रानफुलांच्या कळ्या व बनण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या पठारावर फुलांची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अधून मधून येणारा पाऊस, दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून त्याचबरोबर देशभरातून आणि विदेशातून पर्यटक कास पठाराकडे येऊ लागले आहेत. कास पठारावर किती फुलांच्या प्रजाती उमलल्या आहेत, याचबाबत माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांनी अधिक माहिती दिली.
advertisement
ऑक्टोबर महिन्यादरम्यान कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी, आषाढ बाहुली, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याची फुले बहरत आहेत. पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुलही दिसू लागले आहे. तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल अशा विविधरंगी फुलांचा मोठा बहर येण्यास सुरुवात झाली आहे. हा बहर बघण्यासाठी पर्यटकांची पाऊले आता साताऱ्यातील कास पठाराकडे वळू लागले आहेत.
advertisement
सातारा शहरापासून 25 किमी, महाबळेश्वरपासून 37 किमी आणि पाचगणीपासून 50 किमी अंतरावर कास पठार हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता, UNESCO ने 2012 मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेले स्थळ म्हणून घोषित केले आहे. पुण्यापासून सुमारे 140 किमी अंतरावर असलेल्या या पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आकर्षक फुले येतात.
advertisement
15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO
या ठिकाणाला तुम्ही फुलांचा गालिचाही म्हणू शकता. इथे फुलांच्या 800हून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल 1 हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. त्याचबरोबर पर्यटकांना या ठिकाणी आल्यावर निसर्गाचा अद्भुत रुपही पाहायला मिळते. वातावरणात होणारा अलगद बदलही डोळ्यांनी पाहायला मिळतो. त्यामुळेच देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक
advertisement
याठिकाणी येतात आणि फुलांचा बहर डोळ्यांनी बघून कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळतात, अशी माहिती माझी वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली आहे. तर मग तुम्हालाही याठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच याठिकाणी भेट देऊन या वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 09, 2024 5:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
रंगबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरले साताऱ्यातील कास पठार, मोहित करणारं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती, VIDEO